माझं काकींना आवाहन, आव्हान कहीही म्हणा की, त्यांनी मित्रपक्षाला… अजितदादांचा अपघात अन् रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना थेट आव्हान

Rohit Pawar यांनी सोशल मिडीयावर ट्विट करत थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवारांच्या अपघाची निधनाबाबत आव्हान दिलं आहे.

Rohit Pawar On Sunetra Pawar : ... म्हणून रोहित पवारांकडून Advance मध्ये सुनेत्राकाकींना शुभेच्छा; सोशल मीडियावर ट्विट व्हायरल

Rohit Pawar’s direct challenge to Sunetra Pawar regarding Ajit Pawar’s plane crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला येत्या 28 तारखेला 4 महिने पु्र्ण होत आहेत. मात्र अद्याप देखील त्यांच्या या अपघाताचं गुढ कायम आहे. सुरूवातीला या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहिच पवार यांनी हे प्रकरणं लावून धरत सखोल चौकशीची मागणी केली. पण अद्याप देखील या प्रकरणाची ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. की, संबंधितांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ट्विट करत थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CBI कडं देण्याबाबतचं पत्र आणि नंतर स्मरणपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी त्यांच्या मित्रपक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री आणि अजितदादांचे ‘मित्र’ फडणवीस साहेबांना दिलं होतं. नंतर अधिवेशनातही हा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक उत्तरही दिलं. पण अजितदादांना जाऊन येत्या २८ तारखेला ४ महिने होतायत, तरी अद्यापही हा तपास CBI कडं दिलेला नाही.

‘टेरेरिस्ट’ चे स्पेलिंग लिहून दाखवा, मंत्री शिरसाटांच्या आरोपावर इम्तियाज जलीलांचं प्रत्युत्तर

त्यामुळं माझं सुनेत्राकाकींना आवाहन आहे म्हणा, आव्हान (Challenge) आहे म्हणा किंवा विनंती आहे म्हणा… की त्यांनी येत्या २८ तारखेपर्यंत हा तपास CBI कडं देण्यास त्यांच्या मित्रपक्षाला भाग पाडावं. यानिमित्ताने त्यांचा मित्रपक्ष हा खरंच मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारा अजगरी वृत्तीचा आणखी कुणी आहे, हे स्पष्ट होईल.अजितदादा हे चार-दोन महिन्यात लोकं विसरुन जातील, असे नेते नक्कीच नव्हते… सर्वांना न्याय देणारा हा ‘कामाचा माणूस’ होता आणि त्यांना न्याय कधी मिळणार, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

यासाठी अजितदादांनी निवडून आणलेल्या पण आज ‘विकास’ निधी मिळवण्यासाठी व्यस्त असलेल्या त्यांच्या पक्षाच्या १०० टक्के आमदारांनी वेळात वेळ काढून याबाबत पाठपुरावा करायलाही हरकत नाही. शिवाय आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण सगळ्या यंत्रणा हाती असलेल्या सरकारचीही काही जबाबदारी आहे की नाही? हे सरकार अजून किती दिवस लोकांना वेड्यात काढणार? एक दिवस उत्तर द्यावंच लागेल अन्यथा लोकंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.

follow us