नवा व्हिडिओ करत मोदींची मोठी घोषणा; नंदन निलेकनी यांना उतरवलं मैदानात, दिली मोठी जबाबदारी

मोदी म्हणाले की, अलीकडील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे नुकसान झाले आहे.

Nilekani

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि पालकांना उद्देशून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्यासाठी मोठी घोषणा केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकनी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय परीक्षा सुधारणा टास्क फोर्स स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मोदी म्हणाले की, अलीकडील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत आहे. यासाठी नंदन निलेकनी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा व्यवस्थेत आवश्यक बदल सुचवणार आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, टास्क फोर्स विद्यमान परीक्षा पद्धतीतील त्रुटींचा अभ्यास करून पेपरफुटी रोखण्यासाठी आणि गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक परीक्षा प्रणाली उभारण्यासाठी शिफारसी करेल. सरकार त्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

follow us