लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळणार सोबत, काही महिलांना मिळणार नाही लाभ

फेब्रुवारी, मार्च महिन्यांचे हप्ते एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे पात्र महिलांना एकूण 3 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 26

You will receive the February and March installments along with : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे पात्र महिलांना एकूण 3 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र याचबरोबर काही महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्याची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिलपूर्वी सरकारकडून दोन्ही महिन्यांचे मिळून 3 हजार रुपये थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद कोर्टात, 16 मार्चच्या सुनावणीकडे कुस्तीविश्वाचं लक्ष

सध्या महिलांना जानेवारी महिन्याच्या शेवटचा हप्ता मिळाला होता. त्यानंतर पुढील दोन महिन्यांचे पैसे प्रलंबित होते. आता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळणार असल्याने लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याच प्रक्रियेत काही महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यापूर्वी लाभार्थींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्या कालावधीत अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, मात्र काही र्रजांमध्ये तांत्रिक किंवा माहितीतील चुका आढळून आल्या.

या पार्श्वभूमीवर शासनाने त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसीमध्ये झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतर ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा ज्या महिला योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरतात, त्यांच्या या योजनेतील लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांनी 31 मार्चपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून कोणतीही त्रुटी असल्यास ती तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

follow us