Maharashtra Rain Alert : राज्यात 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस; पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert  : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert  : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला आहे. तर आता या पावसानंतर हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी केला आहे.

गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून (Maharashtra Rain Alert) विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे (Pune Rain Alert) , रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्याता आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  तसेच गडचिरोली, वाशिम, गोंदिया, अकोला, चंद्रपूर आणि अमरावतीसाठी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

हवामान विभागाने (IMD Rain Alert ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यात 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात  मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार; आज ‘या’ राशींना होणार फायदा –

तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये 1 ऑगस्ट रोजी चांगला पाऊस झाल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

follow us