माजी पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे यांच्याकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

घटनेदरम्यान उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला असून, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.

News Photo   2026 08 03T180907.421

शहरातील एका निवासी संकुलात माजी पोलीस (Police) अधिकारी भानू प्रताप बर्गे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकुलाच्या प्रवेशद्वारावर काही कारणावरून भानू प्रताप बर्गे आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर बर्गे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेदरम्यान उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला असून, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.

मोठी बातमी : रणनीतीकार ते आमदार; प्रशांत किशोर यांनी भाजपचा तीन दशकांचा अभेद्य गड भेदला !

घटनेनंतर सुरक्षा रक्षकाने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून, पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी करून घटनेचा तपास करण्यात येत आहे. तसेच, दोन्ही बाजूंचे म्हणणे नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेमुळे माजी पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, कायद्याचे पालन करणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व तथ्ये तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याने पोलिसांच्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बर्गे काय म्हणाले?

मी त्या भागात नियमीत जातो. अनेकदा त्या पार्किंगमध्ये गाडी लावत असतो. त्या दिवशी मी गाडी लावण्यासाठी गेटवर गेलो असता, सुरक्षा रक्षकांनी लांबूनच हातून जागा नाही असं सांगितलं. मीही जागा आहे असं हाताने सांगत होतो. मग मी खाली उतरून गेट उघडण्याचा प्रयत्न केला तर ते सुरक्षा रक्षक माझ्या अंगावर धावून आले त्यावेळी मी त्यांना प्रतिकार केला. मी निवृत्त पोलीस अधिकारी आहे असं सांगितल्यावर तर मग काय झालं असं ते सुरक्षा रक्षक म्हणाले. दरम्यान, त्यांना त्यांची चूक लक्षात आल्यावर त्यांनी माझी माफीही मागितली. परंतु, माध्यमांनी बाजू समजून न घेता एकतर्फी बातम्या चालवल्या आहेत. आता मी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत असंही बर्गे म्हणाले आहेत.

follow us