पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस उपनिरीक्षकाची राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
Pune Police : पुणे पोलीस दलातील उपनिरीक्षक निलेश पाटील यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
Pune Police Suicide : पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक निलेश भाऊसाहेब पाटील यांचा औंध परिसरातील राहत्या घरी मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पाटील हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली असुन घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
निलेश पाटील यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कारण होतं का किंवा अन्य कोणत्या परिस्थितीमुळे ही घटना घडली याबाबतही माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असुन तपासानंतरच घटनेमागचं कारण स्पष्ट होणार आहे.