Pune Traffic Police : पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दंड न भरल्यास लायसन्स होणार रद्द
Pune Traffic Police : पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेत वाहनांवरील थकित दंड न भरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Pune Traffic Police : पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेत वाहनांवरील थकित दंड न भरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तीस दिवसांच्या आत दंड न भरल्यास वाहन मालकाचे लायसन्स रद्द करण्यात यावे याबाबत प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. यानंतर लायसन्स रद्द होण्याची नोटीस वाहन मालकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे देण्यात येणार असल्याची देखील माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच या सगळ्या नोटीसा 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या कालावधीत पाठवण्यात येणार आहे असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. या कारवाईसाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून कारवाईसाठी थेट रस्त्यावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 पासून शहरात ई-चलन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते मात्र ई-चलन मिळून देखील अनेकांनी आतापर्यंत दंडाची रक्कम न भरल्याने आता पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेत कारवाईची सुरुवात केली आहे. ज्या वाहन मालकांनी दंडाची रक्कम भरलेली नाही त्यांना आता नोटीस पाठविण्यात येणार आहे.
नोटीस प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. 30 दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा न झाल्यास लायसेन्स रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित चलनाचा खटला देखील न्यायालयात दाखल करण्यात येणार असं पुणे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
जगात लवकरच ‘एआय त्सुनामी’ ; जीवन कसे बदलले, Anthropic CEO ने A टू Z सांगितलं
तर दुसरीकडे पोलिसांकडून MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वाहन मालकांना नोटीस एसएमएस द्वारे नोटीस पाठवण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर तुम्ही 30 दिवसांच्या आत अधिकृत वेबसाइटवरून https://mahatraf-ficechallan.gov.in दंड भरु शकतात. याच बरोबर Pune Traffic Police App (PTP App) या अॅपवरून दंड भरता येतो.
