अमोल कांगणे स्टुडिओसकडून “करणी” चित्रपटाची घोषणा; शूटिंगला पुणे येथे सुरुवात
अमोल कांगणे यांनी त्यांच्या अमोल कांगणे स्टुडिओ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे.
Amol Kangane Studios announces the film “Karani” : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केलेले अमोल कागणे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. करणी असे या चित्रपटाचे नाव असून, उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन चित्रपट जाहीर करण्यात आला.
अमोल कांगणे यांनी त्यांच्या अमोल कांगणे स्टुडिओ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. हलाल, भोंगा, लेथ जोशी , सिंगल , बेफाम , कनिका, इमेल फिमेल, लॉकडाऊन लग्न अशा चित्रपटांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलं आहे. आता करणी या चित्रपटाची निर्मिती ते करत आहेत. “करणी” या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गोळे आणि सुमित संघमित्रा करत आहेत.
अहिल्यानगरला मोठी संधी, संगमनेर ते संसद? बाळासाहेब थोरातांच्या नावाची दिल्लीपर्यंत चर्चा
“करणी” या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. अभिनेता अभिनय बेर्डे, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी, आशय कुलकर्णी, नितेश चव्हाण, सागर पाठक, आरव पाठक यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अमोल कांगणे यांच्यासारखा अनुभवी निर्माता, अमोल गोळे, सुमित संघमित्रा यांच्यासारखे अनुभवी दिग्दर्शक यांच्यासह उत्तम स्टाररकास्ट असलेला हा चित्रपट संपूर्ण मनोरंजनाची हमी देणारा आहे.
चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट काही परंपरा, चालीरिती यावर आधारित आहे का, असा प्रश्न आहे. मात्र नावावरूनच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या फिल्मचे शूटिंग सध्या पुणे येथे सुरु असून फिल्मास्त्र स्टुडिओस तर्फे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
