महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मानाच्या गदेचे पूजन
Maharashtra Kesari 2025-26 : वर्षा या शासकीय निवासस्थानी 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी 2025-26’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे
Maharashtra Kesari 2025-26 : वर्षा या शासकीय निवासस्थानी 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी 2025-26’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या (Maharashtra State Wrestling Association) मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील (Ramkrishna Satav Patil) यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक 18 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत वाघोली, पुणे याठिकाणी करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पर्धेच्या (Maharashtra Kesari 2025-26) नियोजनाची सविस्तर माहिती घेत आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मा. मुरलीधरजी मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील तसेच कृष्णाजी बुचडे, नटराज सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्षय कुमारने शेअर केला ‘भूत बंगला’चा भीतीदायक पोस्टर, उद्या येणार टीझर-
