500 कोटींच्या कथित व्यवहाराचा मुद्दा तापला; प्रसाद लाडांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाची फडणवीसांकडे धाव, सायबर चौकशी होणार!

Manoj Jarange 500 Crore Audio Clip:जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवून केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Manoj Jarange 500 Crore Audio Clip Prasad Lad Meets Devendra Fadnavis

Manoj Jarange 500 Crore Audio Clip Prasad Lad Meets Devendra Fadnavis: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

तिबेट हादरलं! 7 रिश्टर स्केलचा भूकंप; 16 जणांचा मृत्यू, 46 जखमी

प्रसाद लाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप ऐकवून 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत आरोप केले होते. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या प्रकरणाची सत्यता समोर यावी आणि कथित ऑडिओ क्लिपमधील दाव्यांची शहानिशा व्हावी, यासाठी प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?

शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या या भेटीदरम्यान, जरांगे यांनी केलेल्या आरोपांची तसेच त्यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. केवळ आरोपांच्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

कथित ऑडिओ क्लिपची सायबर विभागामार्फत चौकशी

या कथित ऑडिओ क्लिपची योग्य-अयोग्यता तपासून तिची सत्यता पडताळावी आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. प्रसाद लाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे या भेटीची आणि चर्चेची माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सायबर विभागामार्फत तातडीने चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन दिल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली. तसेच, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यामुळे आता कथित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी सायबर विभागाकडून काय कारवाई केली जाते आणि या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

शिष्टमंडळात कोणाकोणाचा समावेश?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळातील अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, खासदार रवींद्र वायकर, आमदार हेमंत पाटील, माजी खासदार राहुल शेवाळे आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा समावेश होता.

आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा एकत्र, ‘उडता तीर’ची उत्सुकता वाढली!

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप आणि त्यांनी ऐकवलेली कथित ऑडिओ क्लिप यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, आता सायबर विभागाच्या तपासातून या कथित क्लिपची सत्यता स्पष्ट होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us