तिबेट हादरलं! 7 रिश्टर स्केलचा भूकंप; 16 जणांचा मृत्यू, 46 जखमी

Tibet Earthquake 2026; या भूकंपामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. शेकडो घरांचे नुकसान झाले.

Tibet Earthquake 2026 तिबेटमध्ये 7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

Tibet Earthquake 2026: तिबेटमध्ये गुरुवारी (22 ऑक्टोबर) रात्री 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. शेकडो घरांचे नुकसान झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?

रात्रीच्या वेळी भूकंपाचे जोरदार धक्के

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) आणि चीनच्या भूकंपविषयक यंत्रणेच्या नोंदीनुसार, उत्तर तिबेटमधील नागकू (Nagqu) परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री 10:33 वाजता स्थानिक वेळेनुसार हा भूकंप झाला. त्याची खोली जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटची राजधानी ल्हासा शहरापासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर होता.

क्लिप ऐकवल्यानंतर जरांगे संतापले! “फडणवीस साहेब, क्लिपमधील लोकांचा तुम्ही शोध घ्या, नाहीतर यात तुमचा हात आहे, असं समजू”

16 जणांचा मृत्यू, 46 जण जखमी

या भूकंपात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. भूकंपामुळे 339 घरांचे नुकसान झाले असून काही घरे पूर्णपणे कोसळली आहेत. पशुधनासाठी उभारण्यात आलेल्या 20 निवाऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

मदत आणि बचावकार्य सुरू

भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. भूकंपानंतर काही भागांत रस्त्यांवर दरडी कोसळल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

काय राव, जरांगेंनी काय माल पटवलाय, माझ्याकडेही एक क्लिप आहे, अजय बारस्करांचा जरांगेंवर पलटवार

follow us