लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव? शरद पवार स्पष्टच बोलले…
Sharad Pawar On Ladki Bahin Yojana : अजित पवार यांचं बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक
Sharad Pawar On Ladki Bahin Yojana : अजित पवार यांचं बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा जोराने सुरु झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागणीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) अजित पवारांचं (Ajit Pawar) नाव द्या अशी मागणी केल्याने यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारला विचारा असं म्हणत त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. तर दुसरीकडे शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, सुनेभा पवारांना संधी मिळाली याने मी आनंदी आहे. उपमुख्यमंत्री झाल्याने मी खुशीने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना आशीर्वाद देईल. त्यांच्या शपथविधीसंदर्भात मला भाष्य करायचं नाही असं बारामती येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.
तर दुसरीकडे बारामती येथे अजित पवारांचा स्मारक होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत याबाबत काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला अजित पवारांच्या स्मारकाबाबत काहीच कल्पना नाही असं शरद पवार म्हणाले.
“ये रिश्ता क्या कहलाता है” मध्ये अभिराचा नवा मेकॅनिक लूक ठरणार एका नव्या पर्वाची सुरुवात!
28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे जात असताना अजित पवार यांचं एका विमान अपघातात निधन झालं होतं. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे.
