उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती; संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता भूमिका काय? म्हणाले…

उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती; संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता भूमिका काय? म्हणाले…

Ujjwal Nikam Reaction On Santosh Deshmukh Case : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि देशभरातील अनेक गाजलेल्या खटल्यांचे सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली (Rajya Sabha Nomination) आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, आता त्या पराभवानंतर (Santosh Deshmukh Case) थेट राज्यसभेत प्रवेश मिळवणारे निकम हे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय, बीड जिल्ह्यातील गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता ते राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर, या प्रकरणात ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूत द बर्निंग ट्रेन! मालगाडीला भीषण आग, परिसरात आगीचे लोळ; व्हिडिओ व्हायरल

यावर स्वतः उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मी राज्यसभेवर खासदार झालो आहे. त्यामुळे या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करता येईल की नाही, याचा कायदेशीर अभ्यास करेन. तसेच काही ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांशीही याबाबत चर्चा करणार आहे, असं ते म्हणाले. त्यांचं हे विधान स्पष्ट करतं की त्यांनी अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात तगडा युक्तिवाद करण्यासाठी उज्ज्वल निकम यांचीच विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे केवळ सरकारच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

होमिओपॅथी डॉक्टरांना राज्य सरकारचा दणका! ॲलोपॅथी उपचाराची परवानगी रद्द, निर्णय घेतला मागे

उज्ज्वल निकम यांच्या कारकीर्द

मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले अ‍ॅड. निकम यांनी गेल्या काही दशकांत अनेक राष्ट्रीय स्तरावरील खटल्यांत सरकारचं प्रतिनिधित्व केलं आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांच्या युक्तिवादाने त्यांना देशभरात ओळख मिळाली. त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयकडूनही विविध संवेदनशील खटले हाताळले आहेत. यामध्ये 26/11 मुंबई हल्ला, गुलशन कुमार खून प्रकरण, खैरलांजी हत्याकांड, कोपर्डी बलात्कार, शक्ती मिल बलात्कार आणि प्रमोद महाजन हत्या प्रकरण यांचा समावेश आहे. या कामगिरीसाठी त्यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता राज्यसभेच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांचं योगदान काय दिशा घेईल, याकडे देशभरातील राजकीय आणि कायदेशीर वर्तुळांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube