Santosh Deshmukh Case : मकोका हटवण्याचा वाल्मिक कराडचा डाव फसला! निकमांच्या युक्तिवादाने कोर्टात उलथापालथ

Walmik Karad Lawyers And Ujjwal Nikam Argument : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी (Santosh Deshmukh Case) पार पडली. ही सुनावणी न्यायालयात तब्बल दोन तास सुरू होती. या घटनेला आतापाच महिने उलटले आहेत. आज या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बीडच्या मकोका न्यायालयासमोर आठवी सुनावणी झालीय. या सुनावणीदरम्यान वाल्मिक कराडचे ( Walmik Karad) वकिल मोहन यादव अन् विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यात दोन तास युक्तीवाद चालले.
वकील मोहन यादव यांनी म्हटलं की, वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार आहे, असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. मात्र आमचं म्हणणं आहे की, असला कुठलाही पुरावा नाही. अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे. मात्र पुरावा नाही, अशी माहिती वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांनी दिली आहे. काय म्हणाले ते आपण जाणून घेऊ या.
Hindi Language Compulsary : हिंदी भाषेची सक्ती नको पण..,; शरद पवारांनी मौन सोडलं…
कराडविरोधात कायदेशीर पुरावा
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडविरोधात कोणताही कायदेशीर पुरावा नाही. अर्क लावला, मकोका साठी लागतं, त्या कायद्यांची पूर्तता झाली नाही. एकत्र क्लब करायचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यामुळं खंडणीचे गुन्हे येथे नाही. सुदर्शन घुलेवर गुन्हे आहेत, त्यात वाल्मिक कराडचा संबंध नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी स्पष्ट केलंय. आम्हाला मकोका लावून आरोपी केलंय, हे पूर्णपणे चुकीचं नाही. दुसऱ्या केस या केसला अॅप्लिकेबल होत नाही, असं वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांनी म्हटलं आहे.
‘शत्रुच्या घरात घुसून पराभूत केले…’ विखेंचा थोरातांवर जोरदार निशाणा
उज्ज्वल निकम यांचे यु्क्तिवाद
वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नाही. मकोका लागत नाही. अशा प्रकारचा त्यांचा जो युक्तिवाद होता, त्याला आम्ही जोरदार विरोध केला. न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की, त्याच्या विरोधात काय-काय पुरावे आहेत. त्या पुराव्याची जंत्री आज आम्ही न्यायालयासमोर सादर केली. कटाचा सुत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो. आपल्या कठपुतळ्यांमार्फत तो दुष्क्रृत्य करत असतो. किमान अॅक्टिंग करत असतो, त्याप्रमाणे आम्ही न्यायालयात प्रतिपादन केलं. न्यायालयाने आठ जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे, असं संतोष देशमुख यांचे वकिल उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय.