तुला ठार मारील; वाल्मिक कराडकडूनही पंधरा लाखांची खंडणी उकळली !

  • Written By: Published:
तुला ठार मारील; वाल्मिक कराडकडूनही पंधरा लाखांची खंडणी उकळली !

Walmik Karad also received threats for extortion, paid 15 lakhs out of fear for his life : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांड, दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड (Walmik Karad) व इतर आरोपी हे अटकेत आहे. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. त्या दोषारोपत्रात वाल्मिक कराड हाच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. त्यात आता वाल्मिक कराडचे जुने प्रकरण समोर आले आहे. वाल्मिक कराडने जीवाच्या भितीपोटी पंधरा लाख रुपयांची खंडणी दिली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी परळी (Parali) पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांवर माहिती देऊन हे उघड केले आहे.

कलाविश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे यांचं निधन

या प्रकरणी गणेश रमेश उगले यांनी फिर्याद दिली होती. ते धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात टाइप रायटर म्हणून नोकरीला आहेत. एका वर्षापूर्वी शिवराज जनार्धन बांगर (सौंदाना ता. जि. बीड) हा जगमित्र कार्यालयात आला होता. वाल्मिकअण्णा कराड यांना बोललो आहे, त्यांनी मला पंधरा लाख रुपये रोख देण्यास सांगितले आहे. पण उगले यांनी वाल्मिकअण्णा कराड यांना फोन करून विचारणा केली. त्यांनी सांगितले की शिवराज जनार्धन बांगर हा मला वारंवार समक्ष भेटून तसेच व्हॉटसअॅपद्वारे कॉल करून मला पंधरा लाख रुपये मागितले. पंधरा लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारील नाहीतर तुझी समाजामध्ये बदनामी करेल अशी धमकी देत आहे. आणि मला माझ्या जीवाचा धोका नको आहे, त्यामुळे त्याला पंधरा लाख रुपये दे असे म्हटल्याने मी कार्यालयाच्या लॉकरमध्ये ठेवलेले रोख 15 लाख दिले. त्याला पैसे दिल्याचे पैसे ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. त्यावर त्याने ठीक आहे. तुम्हाला यानंतर काही त्रास देणार नाही, असे सांगून तो पैसे घेवून निघून गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

मंदिरातील पुजारी पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर हाके आक्रमक, दिला गंभीर इशारा…

त्यानंतर वाल्मिकअण्णा कराड यांनी मला बोलवून सांगितले की शिवराज जनार्धन बांगर हा त्यांना वारंवार व्हॉटसअॅपवर कॉल करून आणखी पैसे द्या नाहीतर तुला कसेही करून मारून टाकेल, अशी धमकी देत आहे. मला त्याचा खूप त्रास होत आहे, आम्ही आता त्याला परत पैसे दिले तर तो मला मारण्याची धमकी देवून ब्लॅकमेल करून पैसे राहील माझ्या जिवाला त्याच्या पासून धोका आहे. त्यावर आम्ही बरेच वेळ चर्चा केली. त्यांतर शिवराज बांगर यांच्याविरुद्ध कार्यवाही केल्याशिवाय आपल्याला पर्याय आहे. परळी शहर येथे हजर येवून त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube