जालन्यात तरुणाची गोळ्या घालून हत्या; अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
जालन्यात गोळीबार करून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या अवघ्या काही तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
Youth shot dead in Jalna : जालन्यात गोळीबार करून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कदिम जालना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत या दोघांना जेरबंद केलं आहे. अजय विजय अमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काल रात्रीच्या सुमारास चरण प्रल्हाद रायमल, वय 27 वर्षे, हा तरुण आपल्या वाहनावरून जालन्यातील घाटी रोड परिसरातून जात असताना स्कुटीवरून आलेल्या या दोघांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला.
या गोळीबारात चरण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. दरम्यान, आरोपी अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती कदिम जालना पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचत कारवाई केली आणि दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात यश मिळवलं.
स्मृतीसोबतच्या लग्नाअगोदर पलाश मुच्छल दुसऱ्या मुलीसोबत बेडवर; टीम इंडियाच्या मुलींकडून बेदम मारहाण…
सध्या आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं असून हत्येचं नेमकं कारण काय, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का?, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
