GenZ चा IQ आई-वडिलांपेक्षाही कमी; प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट हॉरवाथ यांचा खळबळजनक दावा…
GenZ IQ 15 ते 27 वयोगटातील Gen Z पिढी इतिहासातील पहिली पिढी ठरली आहे, जिचा IQ त्यांच्या पालकांपेक्षा कमी आहे.
Gen Z’s IQ Is Lower Than Their Parents : माणसाची बुद्धी काळानुसार वाढत गेली एवढचं काय तर, प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या पिढीपेक्षा हुशार निघाली. पण आता वेळ उलट फिरलीये, ज्या पिढीला आपण ‘स्मार्ट’ म्हणतोय, त्या आजच्या ‘जेन-झी’ (Gen Z) पिढीचा IQ प्रत्यक्षात आपल्या आई-वडिलांपेक्षाही कमी असल्याचे समोर आलयं. याबाबत प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट डॉ. जॅरेड कुनी हॉरवाथ यांनी हा खुलासा अमेरिकन सिनेटमध्ये सादर केलेल्या रिसर्चनंतर केलाय. हा अहवाल जवळजवळ 80 देशांमधील संशोधन डेटाचे विश्लेषण करून तयार करण्यात आला आहे.
हॉरवाथ यांच्या दाव्याने उडाली झोप
अनेक दशकांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की चांगले शिक्षण, पोषण, आरोग्य आणि कठीण वातावरणामुळे मानवी बुध्यांकामध्ये सातत्याने वाढ होत आवी आहे. ज्याला शास्त्रज्ञ ‘फ्लिन इफेक्ट’ (Flynn Effect) म्हणतात. पण, आता हा इफेक्ट उलटा पडलाय. हॉरवाथ यांनी अमेरिकन सिनेटमध्ये टाकलेल्या बॉम्बनंतर गाची झोपचं उडालीये.
डॉ. होरवाथ म्हणतात की, 1800 च्या उत्तरार्धानंतर पहिल्यांदाच, एका पिढीचा बुद्ध्यांक, मेमरी, लक्ष, वाचन, गणित आणि समस्या सोडवण्याची क्षमता मागील पिढीच्या तुलनेत कमी झाली आहे. 15 ते 27 वयोगटातील आजची GenZ ही तरुण पिढी असे होणारी ही पहिली पिढी बनली आहे. 80 देशांच्या अभ्यासातून 2010 नंतर जन्माला आलेल्या मुलांची बुध्यांक पातळी त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी असल्याचे, समोर आलंय.
आजचे तरुण हे 10 सेकंदांचे व्हिडिओ आणि छोट्या वाक्यात अडकून पडलेत. पण माणसाचा मेंदू अशा छोट्या आणि फालतू गोष्टींसाठी बनलेलाच नाहीये. डोकं चालवण्यासाठी सखोल वाचन आणि समोरासमोर गप्पांची गरज असते असे “डॉ. हॉरवाथ यांचे ठाम मत आहे.
GenZ च्या कमजोरीचं कारण
आजच्या GenZ जनरेशनला वाटतंय की, आपल्याला सगळं समजत असल्याचा ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ त्यांच्यात भरलाय, पण त्यांना स्वतःच्या कमकुवतपणाची जाणीवच नाही. याच धोक्यामुळे आता स्वीडन सारख्या प्रगत देशाने शाळेतून टॅबलेट-लॅपटॉप हद्दपार केलेत आणि पुन्हा पेन-कागद हातात दिलाय. फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलंडसारखे देशही आता डिजिटल शिक्षणाला कात्री लावत आहेत. तर, तंत्रज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे असे युनेस्कोनेही ठणकावून सांगितलंय.
तासनतास फोन स्क्रोल केल्यामुळे तरुणांची मानसिक अवस्था बिघडलीये. वाचनाचं प्रमाण शून्यावर आलंय. कोविडनंतर तर ही परिस्थिती आणखीनच गंभीर झाली असून, आपण मुलांना तंत्रज्ञान देतोय की, त्यांचं भविष्य अंधारात ढकलतोय? हा प्रश्न विचार करण्याची वेळ आता आलीये. त्यामुळे जर तुमच्या घरातील मुलंही जर, तासनतास रील्स बघण्यात आणि चॅटिंगमध्ये गुंग असतील, तर ही त्यांच्या बुद्धीसाठी धोक्याची घंटा आहे.
