दुष्काळाचे गांभीर्य विसरले, उत्सवात लाखोंची उधळपट्टी…कोपरगावकरांमध्ये चर्चेला उधाण…

Koperagon: एकीकडे मदतीचे आवाहन आणि दुसरीकडे उत्सवासाठी लाखोंचा खर्च, हा विरोधाभास नेमका कशाचा? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Kopergaon

अहिल्यानगर : कोपरगाव परिसरात दुष्काळाचे सावट असताना नागरिकांसमोर पाणीटंचाई, शेतीचे संकट, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक अडचणी उभ्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना स्थानिक ठिकाणी खरेदी करा, स्थानिक व्यावसायिकांना सहकार्य करा आणि दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्या, असे आवाहन केले जात आहे. मात्र, दुसरीकडे येथील काही आर्थिक संस्थांच्या वतीने दांडिया रास कार्यक्रम झाला. त्यामध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चाची चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे मदतीचे आवाहन आणि दुसरीकडे उत्सवासाठी लाखोंचा खर्च, हा विरोधाभास नेमका कशाचा? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. उत्सव साजरे करण्याला कोणाचाही विरोध नाही. सामाजिक संस्थांचे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंदाचे क्षण हे समाजजीवनाचा भाग आहेत. मात्र, परिसरातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दुष्काळाच्या काळात खर्चाच्या प्राधान्यक्रमावर विचार होणे आवश्यक आहे. उत्सवासाठी होणाऱ्या खर्चातून काही वाटा दुष्काळग्रस्त शेतकरी, गरजू कुटुंबे, पाणीटंचाईग्रस्त गावे आणि मुक्या जनावरांच्या मदतीसाठी वळवता आला, तर त्यातून समाजाला मोठा दिलासा मिळू शकतो. उत्सव जरूर साजरे करा..पण दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेच्या वेदनांचाही विसर पडू देऊ नका..

follow us