भूमिगत वीज वाहिन्यांची घोषणा हवेतच विरली; आता कोपरगावकरांना बावनकुळेंचे नवं आश्वासन

Kopergaon NagarPalika Election: वीज वाहिन्यांची घोषणा पूर्ण न करणारे उतारे काय देणार असा प्रश्न कोपरगावकरांना पडलाय.

  • Written By: Published:
Revenue Minister Chandrashekhar Bawankule koperagon nagarpalika

Kopergaon NagarPalika Election: आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, लबाडाचं आवतनं जेवल्याशिवाय खरं नाही याचा अनुभव नुकताच कोपरगावकरांना (Kopergaon)आला असून राज्याचे उर्जामत्री असतांना कोपरगावात येवून कोपरगाव शहराच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणार अशी घोषणा करणारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) हे बुधवारी कोपरगावला आले आणि पुन्हा एकदा जागेचे उतारे नावावर करून देण्याची घोषणा करून गेले. मात्र कोपरगावकरांना आजही लोंबकळत असणाऱ्या वीज वाहिन्या आणि वाकलेले पोल दृष्टीस पडत असल्यामुळे भूमिगत वीज वाहिन्यांची घोषणा पूर्ण न करणारे उतारे काय देणार असा प्रश्न कोपरगावकरांना पडलाय. हा निवडणुकीचा जुमला असल्याची जोरदार चर्चा कोपरगावात (
Kopergaon NagarPalika Election) सुरु झाली आहे. त्यामुळे ते कोपरगावात आले आणि पुन्हा फेकाफेकी करून गेले आणि भूमिगत वीज वाहिन्यांची घोषणा अजूनही हवेतच असून उतारेही हवेतच जातील अशा चर्चांना जोर आला आहे.

ब्रेकिंग : अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; आता पुढचा ‘डाव’ फडणवीस खेळणार

कोपरगाव नगरपालिकेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूलमंत्री यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचे आणि वर्ग २ च्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्याचे तसेच शासकीय जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरीकांना उतारे देणार असल्याची पुन्हा एकदा लोकप्रिय घोषणा करून गेले. मात्र त्याचवेळी कोपरगावकरांना ज्यावेळी ऊर्जा मंत्री असतांना कोपरगावला येवून त्यांनी कोपरगाव शहराच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर आजपर्यंत भूमिगत वीज वाहिन्यांसाठी कुठेही नाली खोदल्याचे कोपरगावकरांना आढळून आले नाही.त्यामुळे जशा लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या आजही हवेतील घोषणेप्रमाणे आजही हवेत लोंबकळत आहेत. त्याप्रमाणेच उतारे देणार ही घोषणाही हवेत विरून जाणार असून यावर कसा विश्वास ठेवायचा हे कोपरगावकर स्पष्टपणे बोलत आहेत.

पुणे महापालिकेत भाजपला किती जागा मिळणार? गणेश बिडकरांनी थेट आकडाच सांगितला

हा सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे कुणाही राजकीय व्यक्तीला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी लाव रे तो व्हिडीओ हा फंडा प्रचलित झाला होता. हाच फंडा कोपरगावकरांनी महसूल मंत्र्यांच्या बाबतीत वापरला असून उर्जा मंत्री असतांना कोपरगावात येवून कोपरगाव शहराच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणार अशी घोषणा त्यांनी केली होती. नेमका तोच व्हिडीओ कोपरगावकरांना सापडला असून ज्यांनी घोषणा करूनही वीज वाहिन्या भूमिगत केल्या नाही ते काय उतारे देणार? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला असून लबाडाचं आवतनं जेवल्याशिवाय खरं नाही असं कोपरगावकर मिस्कीलपणे बोलत आहे.

त्यावेळी उर्जा मंत्री असतांना कोपरगावात आले आणि घोषणा करून गेले मात्र त्यावर कार्यवाही काहीच झाली नाही त्यानंतर पुन्हा कोपरगावला आले आणि घोषणा करून गेले त्यामुळे ते फक्त घोषणा करायलाच येतात का? आणि घोषणा देण्यात पटाईत असलेले कोल्हे त्यांनाच का बोलवता? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला आहे. तसेच कोपरगावकरांना जे काही द्यायचे ते भाजपचे उमेदवार निवडून आले तरच देणार त्यांच्या या वक्तव्याची पण जोरदार चर्चा सुरु असून भूमिगत वीज वाहिन्यांप्रमाणे उताऱ्याचा प्रश्न पण हवेतच तरंगत राहणार असल्याच्या चर्चेने मात्र जोर धरला आहे.

follow us