ब्रेकिंग : अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; आता पुढचा ‘डाव’ फडणवीस खेळणार
Manikrao Kokat सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं
Manikrao Kokate Resign Accepted By Ajit Pawar : शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि १० हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यानंतर आज (दि.17) जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केले असून, कोकाटेंना कोणत्याहीक्षणी अट होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमध्ये कोकाटेंनी दिलेला राजीनामा अजित पवारांनी (Ajit Pawar) स्वीकारला असून, याबाबत खुद्द दादांना एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता फडणवीस कोकाटेंबाबत पुढचा काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Video : विवाह ते विवादापर्यंतच्या समस्यांवर भाजप खासदाराने सांगितला ‘राम’बाण उपाय
अजितदादांकडे क्रीडा खात्याचा कारभार
अटकेची टांगती तलवार असलेल्या कोकाटेंनी काल (दि.17) त्यांच्या पदाचा राजीनामा दिली होता. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी अजित पवारांना देण्यात आली आहे. (Manikrao Kokate ) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्याकडे असलेल्या क्रीडाखात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
अजित पवारांची पोस्ट काय?
माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. Manikrao Kokate Resign Accepted By Ajit Pawar
सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.
माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन… pic.twitter.com/vmba0u3ao4
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2025
नेमकं प्रकरण काय?
कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांबाबत बनावट कागदपत्रे सादर करून त्या लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निकालानंतर अवघ्या दोन तासांत त्यांना जामीन मंजूर झाल्याने कोकाटे यांचे मंत्रीपद तत्काळ धोक्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर काल जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती.
1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.
कोकाटे यांची राजकीय कारकिर्द कशी?
14 ऑगस्ट 1991 – युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
1992- जिल्हा परिषद सदस्य
1993- 1996 पंचायत समिती सभापती
1996 पासून आज तगायत 24 वर्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक
जिल्हा बँकेत तीनदा चेयरमन म्हणून नियुक्ती
1997 साली पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य
1997 – कृषी व पशु संवर्धन सभापती नाशिक जिल्हा परिषद
1999 साली पहिल्यांदा आमदार
2994 साली सलग दुसऱ्यांदा आमदार
1 जानेवारी 2008 साली सिन्नर दूध उत्पादक संघाची स्थापना व आज तगायत संचालक व चेयरमन
2008 09- महाराष्ट्र शिखर बँक संचालक
2009 साली सलग तिसऱ्यांदा आमदार
2014 विधानसभा निवडणुकीत पराभव
2019- ला अपक्ष लोकसभा निवडणूक लढवून पराभव
2019- विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आमदार.
सिन्नर विभागीय दूध संघाचे चेअरमन
2024- विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी
