कल्याण- डोंबिवलीत पुन्हा ट्विस्ट, मनसेचा होणार महापौर? एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय

Kalyan-Dombivli Municipal Corporation : नुकतंच राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून अपेक्षाप्रमाणे

  • Written By: Published:
Kalyan Dombivli Municipal Corporation

Kalyan-Dombivli Municipal Corporation : नुकतंच राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून अपेक्षाप्रमाणे स्वबळावर निवडणूक लढवून देखील महायुतीने अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. त्यामुळे महायुतीकडून महापौर पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीतील दोन्ही घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

या निवडणुकीत भाजपने (BJP) 50 तर शिंदे शिवसेनेने (Shivsena) 53 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महापौर पदासाठी दोन्ही पक्षांकडून दावे करण्यात येत आहे. कल्याण – डोंबिवली महापालिकेसाठी (Kalyan-Dombivli Municipal Corporation) अनुसूचित जातीसाठी महापौर आरक्षण जाहीर झालं आहे. आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर कल्याण- डोंबिवली महापालिका महापौरसाठी जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. तर आता एक मोठा ट्विस्ट आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण- डोंबिवली महापालिका महापौरसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता शिवसेनेने 7 तर मनसेने एक उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे कल्याण- डोंबिवली महापालिकेत महापौर पदासाठी मनसे देखील रिंगणात उतरल्याने राजकीय गणित बदलणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलिसाकडून नको ते घडलं अन्…, मोठी दुर्घटना टळली

कल्याण – डोंबिवली महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाने विकासाच्या मुद्द्यावर मनसेसोबत युती केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तर महापौर पदासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने संध्याकाळीपर्यंत आणखी नवीन काही ट्विस्ट येणार का ? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us