अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलिसाकडून नको ते घडलं अन्…, मोठी दुर्घटना टळली
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं असून काल 29 जानेवारी रोजी बारामतीच्या
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं असून काल 29 जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील आणि राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. तसेच लाडक्या दादाला अंतिम निरोप देण्यासाठी यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले. यानेळी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. तसेच अजित पवार यांना सलामी म्हणून पोलीस दलाकडून तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले मात्र यावेळी एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती आता समोर येत आहे.
माहितीनुसार, अजित पवार (Ajit Pawar) यांना सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झालं. सलामी देण्यासाठी बंदूक लोड करताना पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून गोळी झाडली गेली. अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली.
नेमकं घडलं काय?
अजित पवार यांना अखेरची सलामी देण्यासाठी पोलीस दलाकडून तीन राऊंड हवेत फायर करण्यात येत होते. समोरच्या रांगेतील पोलीसांकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना एका पोलिस कर्मचाऱ्याकडून मिसफायर झालं. यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाला जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून मुखाग्री दिली जात होती.
पुण्यावर दुसऱ्यांदा शोककळा; माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे निधन
सुदैवाने बंदुकीतून सुटलेली गोळी कोणाला लागली नाही. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेत मोठे नेते आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.
