Parali APMC Elction : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या संधी गमावल्यामुळे…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 11T122102.456

Pankaja Munde :  राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणुक म्हणजे आपल्या मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्याची संधी म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुकीत सगळे दिग्गज नेते शड्डू ठोकून उतरले आहेत.

या निवडणुकीत बीड जिल्ह्यात येऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त भाजपा नेत्या पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत. काही दिवस शिल्लक राहिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. सध्या परळी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची सत्ता आहे. आणि हीच सत्ता राखण्याचं आव्हान धनंजय मुंडेंसमोर असणार आहे.

राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही आमचं म्हणणं…

तर पंकजा मुंडे या निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 2019 साली विधानसभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. आता 2024च्या विधानसभेला अवघे दीड वर्ष शिल्लक असताना ही निवडणुक दोन्ही पक्षांसाठी महत्वाची असणार आहे.

त्याअनुषंगाने  परळीत बाजार समिती निवडणुकीच्या निमित्त पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतून पंकजा मुंडे यांनी उमेदवारांसह सभासदांना मार्गदर्शन केले. ही निवडणूक तुम्ही नाही तर मी लढणार आहे. आपण आपली चटणी भाकरी खाऊ पण आपले इमान गहाण ठेवायचं नाही. असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं आहे. निवडणुकीच्या वेळी काही जण पुरणपोळी वाटतील पण आपण ती खायची नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.

कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

आपल्या कार्यकर्त्यांनी बघितले आहे की गमावून काय होते ते.  तुमच्यामुळे जिलह्याने गमावले आहे. जिल्ह्यायमुळे महाराष्ट्राने गमावले आहे. एक माणुस जो नव्या महाराष्ट्राच्या गावागावात विकास करु शकत होता. एक चांगला माणुस  राजकारणापासून दूर राहू नये म्हणून आता इथून पुढील जबाबदारी तुमच्यावर आहे,  असे त्या उपस्थितांना म्हणाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube