मोठी बातमी! रितू तावडे मुंबईच्या महापौर तर संजय घाडी उपमहापौर होणार
BMC Mayor : भाजपच्या रितू तावडे सव्वा वर्षासाठी तर शिवसेनेचे संजय घाडी सव्वा वर्षासाठी मुंबईचे उपमहापौर होणार
BMC Mayor : भाजपच्या रितू तावडे सव्वा वर्षासाठी तर शिवसेनेचे संजय घाडी सव्वा वर्षासाठी मुंबईचे उपमहापौर होणार असल्याची माहिती मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे. आज महापौर पदासाठी भाजपा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून शिवसेना देखील आजच उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहे. रितू तावडे प्रभाग क्रमांक 123 मधून भाजपच्या नगरसेविका असून आता त्यांच्या नावाची घोषणा महापौर पदासाठी भाजपकडून करण्यात आली आहे. रितू तावडे मुंबई महापालिकेत दोन टर्मच्या नगरसेविका आहेत.
घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारांमधील मराठी चेहरा म्हणून रितू तावडे (Ritu Tawade) यांची ओळख आहे. त्यांच्याकडे मुंबई महापालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा अनुभव आहे. याच बरोबर त्यांनी स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षपदही भूषवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी वीज दरवाढीविरोधात आंदोलन करत जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्याकडे भाजपच्या ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहार म्हणून देखील पाहायला जातो.
तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी (Sanjay Ghadi) मुंबईचे उपमहापौर होणार आहे. संजय घाडी सध्या शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून पक्षात काम करत आहे. ते 1988-89 पासून शिवसेनाप्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागप्रमुख आहे. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य आहे. ते 2017 पासून नगरसेवक असून 2026 मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची घोषणा करण्यात आली असून भाजपच्या रितू तावडे पुढील सव्वा वर्षासाठी मुंबईच्या महापौर होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी उपमहापौर होणार आहे. नुकतंच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या मात्र भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता न आल्याने भाजपने शिवसेनासोबत युती करत मुंबईत महापौर बसवला आहे.
T20 World Cup 2026 ची आजपासून सुरुवात, टीम इंडिया रचणार इतिहास?
