स्मार्टनेसची पुढची पायरी! माझ बाळ पडलयं, खतरनाक प्लॅन करत महिलेने स्वच्छ करून घेतलं ‘गटार’
गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छ असलेलं गटार साफ करण्यासाठी महिलेनं चक्क पोटच्या गोळ्याला गटारात पाडलं अन् चिमुकल्याच्या शोधासाठी
Women Trick For Cleaning Open Drain : गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छ असलेलं गटार साफ करण्यासाठी महिलेनं चक्क पोटच्या गोळ्याला गटारात पाडलं अन् चिमुकल्याच्या शोधासाठी प्रशासन हात धुवून कामाला लागलं संपूर्ण गटार स्वच्छ झालं पण हाती काही पोरगं सापडलं नाही. त्यानंतर महिलेचा हा सर्व प्रकार गटार स्वच्छ न करणाऱ्या आणि झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला खडबडून जागं करण्यासाठी होता असे समोर आले. याबाबतचा एक व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका महिलेने “माझं बाळ नाल्यात पडलं आहे” असा दावा केला. महिलेच्या या दाव्यानंतर मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि प्रशासन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू केले. तब्बल तीन तास या ठिकाणी बाळाचा शोध घेण्यासाठी गटारात साचलेला कचरा आणि चिखल उपसून काढत कसून शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, काही केल्या पडलेल्या बाळाचा शोध लागला नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून येथील स्थानिकांनी अस्वच्छ नाला साफ करण्याची मागणी केली होती. मात्र, नागरिकांच्या तक्रारींनंतरही प्रशासनाकडून कोणतेही पाऊलं उचलण्यात येत नव्हते. अखेर या महिलेने तुंबलेला नाला स्वच्छ करून घेण्यासाठी ‘खतरनाक’ प्लॅन केला आणि तो यशस्वीपण झाला.
In India, a woman tricked police and civic teams into cleaning an open drain for three hours by falsely claiming someone had fallen into it. pic.twitter.com/q56tmilga8
— non aesthetic things (@PicturesFoIder) February 3, 2026
नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया
महिलेच्या या खतरनाक प्लॅनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, अनेक यूजर्सने यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने महिलेची ही युक्ती ‘स्मार्ट’ असल्याचं म्हटलं आहे तर, काहींनी ‘लांडगा आला रे’ या गोष्टीचा संदर्भ देत भविष्यातील धोक्यांकडे लक्ष वेधलं आहे. “आज खोट्या कारणामुळे काम झालं असले तरी, भविष्यात जेव्हा खरोखरच एखादी इमर्जन्सी येईल, तेव्हा प्रशासन याला गांभीर्याने घेणार नसल्याचे मत काही यूजर्सने व्यक्त केले आहे.
