Santosh Deshmukh Case: …म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती उशीरा, CM फडणवीसांचा खुलासा…

Devendra Fadnavis : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam ) यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर काही दिवसांपूर्वी निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली. दरम्यान, हे हत्या प्रकरण निकम यांच्याकडे सोपवण्याठी इतका वेळ का लागला, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.
औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळणाऱ्या आझमींच्या जीवाला धोका; म्हणाले …तर सरकार जबाबदार
एका वृत्त वाहिनीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी इतका वेळ का लागला? असा सवाल विरोधकांकडून सातत्याने होतोय. याविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, निकम यांच्या नियुक्तीला विलंब का झाला? याचं कारण, प्रॉसिक्युशनच्या नियमानुसार, प्रॉसिक्युशन लॉयर चार्जशीटीमध्ये असिस्ट करू शकत नाही. त्यामुळं ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली, त्याच दिवशी आपण फिर्यादी वकिलांना अपॉइंट करू शकतो. पण हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं काही लोक फक्त आरोप करत असतात…. चार्जशीट दाखल झाल्यानंतरच आपण निकम यांना नियुक्त केलं, असं फडणवीस म्हणाले.
एक अविश्वसनीय प्रेमकथेचा प्रवास, “माझी प्रारतना” सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज
प्रॉसिक्युशन लॉयरने चार्जशीटमध्ये हस्तक्षेप केला असेल तर टेक्निकली ही केस होत नाही, असा सुप्रिम कोर्टाचा निर्णय आहे. हेही लोकांना कळत नाही. लोक फक्त टीका करतात. त्यांना व्यवस्था समजत नाही, असं फडणवीस म्हणाले.
मुंडेंचा राजीनामा घ्यायला इतका उशीर का लागलाय, असा सवाल सामान्य जतना करत आहे. यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. ते ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की, चुकीच्या वेळी झाला. याच्या चर्चेत मी जात नाही. राजकारणात, पहिल्या दिवशी राजीनामा घेतला किंवा शेवटच्या दिवशी घेतला तरी लोकांना जे बोलायचं तेच लोक बोलतात. या हत्येतील जे फोटो समोर आले, ज्या प्रकारे हत्या झाली आणि हत्येचा मास्टरमाईंड ज्याला म्हटलं गेलं, तो मंत्र्यांचा इतका जवळ होता की, मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे दिला पाहिजे. युतीचं सरकार असल्याने आम्हाला निर्णय घ्यालायला उशीर झाला. पण आम्ही फर्मली डील केलं आणि मुंडेंनी राजीनामा दिला, असं फडणवीस म्हणाले.
तपासात कोणीही हस्तक्षेप केला नाही…
पुढं ते म्हणाले, बीडची घटना घडली. त्यानंतर मी सीआयडीची चौकशी लावली. मी सीआयडीच्या लोकांना सांगितलं की, या तपासात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. तुम्ही पूर्ण क्षमतेने तपास करा. सीआयडीने चांगला तपास केला. आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेले, हरवलेले मोबाईल शोधले. तसेच त्यांनी डिलीट झालेला डेटा पुन्हा मिळवला. त्यामुळं देशमुख हत्या प्रकरणाचे फोटोही समोर आले. ते फोटो कोणी शोधले नाही, तर ते चार्चशीटमधील आहेत. सीआयडीच्या तपासात कोणाही हस्तक्षेप केला नाही, असं फडणवीस म्हणाले.