Video : अखेर नामदेव शास्त्री महाराजांना उपरती झाली; म्हणाले, देशमुख कुटुंब भेटल्यानंतर मला…

Video : अखेर नामदेव शास्त्री महाराजांना उपरती झाली; म्हणाले, देशमुख कुटुंब भेटल्यानंतर मला…

Namde Shastri on Santosh Deshmukh Murder Case : गेल्या काही दिवसांत भगवान गडाचे महंत नामदेश शास्त्री महाराज चर्चेत आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं होत आणि त्याचवेळी धनंजय मुंडे यांचं कौतुकही केलं होत. दरम्यान, संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख (Deshmukh) आणि कुटंबही त्यांना गडावर जाऊन भेटलं. आता मात्र, नामदेव शास्त्री महाराजांना अखेर उपरती झाली आहे.

नामदेव शास्त्री माध्यमांशी बोलताना म्हणाले, देशमुख हत्याकांडाची मला पूर्ण कल्पना नव्हती. संतोष देशमुख यांचा बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय जेव्हा मला गडावर भेटण्यासाठी आले तेव्हा त्यांनी मला या घटनेची जाण करून दिली. त्यानंतर माझी भावना बदलली. मलाही याविषयी जाण झाली. भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. न्यायालयाला प्रार्थना आहे की हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा असं नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मी स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी याविषयी का बोलत नाही. सर्वच पक्षातील महिला पदाधिकारी, आमदार का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर महिला आयोग कुठंय असा सवालही त्यांनी केला आहे. त्याबरोबर आज माझ्या सर्वकाही लक्षात आलं आहे. माझी भावना बदलली आहे असंही नामदेश शास्त्री यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते नामदेव शास्त्री?

धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे नाहीत, त्यांच्यावर गेल्या ५३ दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे.  जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे. यात आमच्या सांप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ते आमच्या क्षेत्रात असते तर इतका त्रास झाल्यानंतर मोठे महंत झाले असते. त्याचवेळी ज्या आरोपींना संतोष यांना मारलं त्यांची मानसिकता तपासायला पाहिजे होती असंही शास्त्री म्हणाले होते. त्यांच्या विधाननंतर मोठा वादंग निर्माण झाला होता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या