Santosh Deshmukh Murder : ‘आरोपींचे कुणीशीही लागेबांधे असले तरी…’; DCM शिंदेंचा थेट इशारा

  • Written By: Published:
Santosh Deshmukh Murder : ‘आरोपींचे कुणीशीही लागेबांधे असले तरी…’; DCM शिंदेंचा थेट इशारा

Eknath Shinde on Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला ३५ दिवस उलटून गेले तरीही एक आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता इतर आरोपींवर मोक्काचा (MCOCA) गुन्हा दाखल केला. कराडवर कारवाई व्हावी यासाठी आज धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी तीव्र आंदोलन केलं. या सर्व घडामोडीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलं.

जपानमध्ये त्सुनामीचा इशारा 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपामुळे जमीन हादरली 

आरोपीचे कुणाशी जरी लागेबांधे असले तरी त्यांना सोडले जाणार नाही, असं शिंदे यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे गावी गेले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, बीड हत्या प्रकरण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली असून सीआयडी देखील चौकशी करत आहे. आरोपींवर मकोका लावण्यात आला. या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही. आरोपींचे कुणीशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींनी ज्या निर्घृण पद्धतीने हत्या केली, तशाच प्रकारे त्यांनाही फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रीया पार पाडले, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

मी पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा 

संतोष देशमुख प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरलं. त्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, एका लोकप्रतिनिधीची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या होत असेल तर कुणीही शांत बसणार नाही.आम्हीही त्यांना न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न करू, असं शिंदे म्हणाले.

विष्णू चाटेला १४ दिवसांचा कोठडी…
दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube