live now
मुंबई, पुणे अन् अहिल्यानगरमध्ये ‘महिलाराज’; 29 महापालिकांची महापौर सोडत वाचा एका क्लिकवर
मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार Municipal Corporation Mayor Reservation Updates
Maharashtra 29 Municipal Corporation Reservation Live Updates : राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौरपदासाठी आज (दि.22) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदासाठी आरक्षण काढण्यात आली. आता राज्यातील 29 महापालिकांमध्ये कोणत्या प्रवर्गातील महापौर बसणार हे स्पष्ट झाले आहे. यासोडतीचा पॉईंट टू पॉईंट अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर होणार?
1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
2. नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण (महिला)
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण (महिला)
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
13. पुणे: सर्वसाधारण (महिला)
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण (महिला )
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण (महिला)
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी
-
दुसऱ्या सोडतीला ठाकरे गटाचा आक्षेप
सोडत क्रमांक - 2 मध्ये किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेत चिट्ट्या नवीन पेपर घेऊन करावे याबाबत घेतला आक्षेप
-
KDMC मध्ये असणार ST प्रवर्गाचा महापौर
महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर कल्याण -डोंबिवली मनपासाठी अनुसूचित जमातीचा अर्थात ST पुरुषसाठी राखीव
-
आरक्षण सोडतीची प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार
राज्यातील 29 महापालिकांच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल. यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात असून संपूर्ण प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार आहे. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी, यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. सध्या कायद्यात एससी, एसटी, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे.
-
पुण्यात आरक्षित गटाप्रमाणं कोणाला मिळू शकते संधी? 'ही' नावं चर्चेत
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ११९ जागांवर विजय मिळाला आहे. महापालिकेतील एकूण १६५ नगरसेवांपैकी ११९ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळं भाजपच्या यादीत दहा जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, गणेश बिडकर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, रोहिणी चिमटे, किरण दगडे पाटील आणि दिलीप वेडे पाटील या नावांची चर्चा आहे.
आरक्षणानुसार कोणाला संधी?
सर्वसाधारण पुरुष/महिलाधीरज घाटे (प्रभाग क्र. २७)
गणेश बिडकर (प्रभाग क्र. २४)
दिलीप वेडे पाटील (प्रभाग क्रं. १०)
मंजुषा नागपूरे (प्रभाग क्र. ३५)
मानसी देशपांडे (प्रभाग क्र. २०)
श्रीनाथ भिमाले (प्रभाग क्र. २१)
वर्षा तापकीर (प्रभाग क्र. ३७)
---------------------------------
अनुसुचित जमाती पुरुष/महिला
रोहिणी चिमटे (प्रभाग क्र. ९)
--------------------------------
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष/महिला
किरण दगडे पाटील (प्रभाग क्र. १०)
राजेंद्र शिळीमकर (प्रभाग क्र. २०)
-
कोणत्या महापालिकांसाठी आरक्षण सोडत?
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, नांदेड.
-
आरक्षणाची सोडत कशी निघणार?
प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या जातील.
अनुसूचित जाती (SC) व जमाती (ST) सर्वप्रथम या प्रवर्गांची सोडत निघेल.
ओबीसी (OBC): त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल.
खुला प्रवर्ग (Open): शेवटी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण स्पष्ट होईल.
महिला आरक्षण: प्रत्येक प्रवर्गात 50% जागा महिलांसाठी राखीव असतील, ज्याची स्वतंत्र सोडत काढली जाईल.
-
कधी निघणार सोडत?
नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीचे महापौरपद निश्चित केले जाणार आहे.
