जपानमध्ये त्सुनामीचा इशारा 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपामुळे जमीन हादरली
Japan Earthquake: जपानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जपानमध्ये 6.8 रिश्टर स्केल (Japan Earthquake) तीव्रतेचा भुकंप झाला आहे. त्यानंतर हवामान विभागाकडून जपानमध्ये त्सुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नैऋत्य जपानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.
जपान हवामानशास्त्र संस्थेने याबाबत माहिती देत सांगितले की, क्युशू (Kyushu) प्रदेशातील मियाझाकी राज्याजवळ स्थानिक वेळेनुसार रात्री साडे नऊच्या सुमारास 6.9 रिश्टर स्केलच्या तीव्र झटका बसला आहे. त्यानंतर हवामान विभागाकडून 3 फूटच्या त्सुनामीच्या लाटांचा इशारा जारी करण्यात आला आहे. याच बरोबर हवामान विभागाने किनारी भागातील लोकांना समुद्र आणि आजूबाजूच्या परिसरांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाचे केंद्र क्यूशू बेट असल्याचे जपानी हवामान विभागाकडून सांगितले जात आहे.
A magnitude 6.6 earthquake struck Kyushu region in Japan on Monday, the European Mediterranean Seismological Centre said: Reuters pic.twitter.com/ZWnnkk8OEd
— ANI (@ANI) January 13, 2025
तर दुसरीकडे तिबेटमध्ये देखील 7 जानेवारी रोजी भूकंपामुळे मोठी जीवित हानी झाली होती. तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.1 होती, ज्यामध्ये 126 लोकांचा मृत्यू झाला होता तर 30 हजारपेक्षा जास्त नागरिकांना स्थालंतर करावे लागले होते. तसेच या भूकंपाचे भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये देखील धक्के जाणवले होते.
Godakath Festival : गोदाकाठ महोत्सवातून महिला बचत गटांच्या चळवळीला मिळणार चालना
जपानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
जपानमध्ये वारंवार भूकंप होत असतात. जपान पॅसिफिक बेसिनमध्ये वसलेला आहे, ज्यामुळे टेक्टोनिक प्लेट्स वेळोवेळी एकमेकांशी टक्कर देत राहतात. या भागाला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात. कारण हा भाग भूकंपप्रवण आणि ज्वालामुखीयदृष्ट्या सक्रिय असल्याचे म्हटले जाते. टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे भूकंप होतात. 2004 मध्ये जपानमध्ये झालेल्या भूकंपात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. हजारो इमारती कोसळल्या होत्या.