कोल्हापूरात महायुतीची त्सुनामी, महाविकास आघाडीचा क्लीन स्वीप, ‘हे’ आहे कारण
Maharashtra Assembly Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल आज जाहीर झाले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात महायुतीची त्सुनामी पाहायला मिळाली आहे.
जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात महायुती उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचा देखील पराभव झाल्याने जिल्ह्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ऋतुराज पाटील यांनी सतेज पाटील यांचा 18,131 मतांनी पराभूत केला आहे.
तर दुसरीकडे कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे आणि कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे उमेदवार अमल महाडिक विजयी झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात राहुल आवाडे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. जागा वाटपादरम्यान सतेज पाटील यांनी काँग्रेसकडे विद्यमान चार जागांसह शिरोळची जागा घेतली होती. मात्र काँग्रेसला एकही जागेवर विजय मिळाला नाही. तर चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. मात्र तो सुद्धा भाजप बंडखोर उमेदवार असल्याने महाविकास आघाडी जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. तर दुसरीकडे इचलकरंजीमधील भाजप उमेदवार राहुल आवाडे यांनी जिल्ह्यात जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना या निवडणुकीत 56 हजार 811 मताधिक्य मिळालं आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मदन कारंडे यांचा पराभव केला आहे.
तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कागल विधानसभा निवडणुकीमध्ये (Kagal Assembly Elections) पुन्हा एकदा माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांचा पराभव केला आहे. हसन मुश्रीफ यांना पराभव करण्याचे आवाहन स्वतः शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते मात्र कागल विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली.
तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी विजयीची हॅट्रिक केली आहे. त्यांनी यावेळी 37 हजार 897 मतांनी ठाकरे गटाचे माजी आमदार के पी पाटील यांचा पराभव केला आहे. माहितीनुसार, प्रकाश आबिटकर यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद लावली होती.
चंदगड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील त्यांनी बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार नंदिनी बाभूळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार राजेश पाटील यांना पराभव केला आहे.
Wayanad By-Election Result: वायनाडमधून प्रियंका गांधींची राजकीय इनिंग सुरु, 4 लाख मतांनी विजयी
कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांनी मैदान मारले आहे. त्यांनी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांनी 29 हजारांवर मतांनी विजय मिळवला आहे. तर हातकणंगलेमधून जनसुराज्यच्या अशोकराव माने यांनी काँग्रेस उमेदवार राजू आवळे यांना धक्का मैदान मारले. राज्यात महायुतीने आतापर्यंत 236 जागांवर आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडी फक्त 49 जागांवर पुढे आणि 3 जागांवर इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार पुढे आहे.