एकनाथ शिंदे निकालानंतर शरद पवारांसोबत जाणार का? संजय शिरसाट यांनी दिलं उत्तर
Sanjay Shirsat Statement On Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2024) मतदान पूर्ण झालंय. यानंतर सर्वच पक्षांमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना विचारण्यात आलं की, एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधी पक्ष शरद पवार यांच्यासोबत जाणार का? त्यावर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो नेहमीच राहील.
संजय शिरसाट म्हणाले की, महाविकास आघाडी कमकुवत झाल्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली आहे, त्यांच्या चेहऱ्याला पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा आमचा आग्रह, त्याला कदाचित मान्यता ही मिळेल. एकनाथ शिंदे माझ्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हावेत असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.
मोठी बातमी! बच्चू कडूंना महायुती अन् मविआचाही फोन; नेमकं काय घडतंय?
यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितलं की, शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाण्याचा प्रश्नच नाही. शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत राहतील, हे त्यांच्या पक्षातील नेता सुद्धा ठोकपणे सांगू शकत नाही. शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. शरद पवार काहीही करू शकता, मागच्या वेळेस त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. शरद पवार योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, अशी भूमिका शिरसाट यांनी स्पष्ट केलीय.
शिरसाट म्हणाले की, यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची अनेक कारणे आहेत. जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. नागरिक देखील जागरुक झाले आहेत. संजय राऊतच महाविकास आघाडीची बिघाडी करतील. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची वाट लावली असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. संजय राऊत यांनी आंबेडकरांना टोमणा मारला. त्यांचा अपमान केलाय, नेत्याचा अपमान करणे गैर असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
जिलबी… गोड की गुढ? प्रेक्षक कोड्यात, स्वप्नीलने केली नव्या प्रोजेक्टची घोषणा
राऊत यांची माहिती चुकीची आहे. आम्ही शंभर शंभर कोटीचे खोके पाठवले आहेत. लोकांनी यांची जागा त्यांना दाखवली आहे, यांच्या तोंडात खोके आणि बोके शिवाय काहीच नाही. संजय राऊत सिल्वर ओकवर जाऊन सरकार स्थापन करणार आहेत. शरद पवार राज्यपाल असतील. संजय राऊत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड असतील अशी टीका संजय शिरसाट यांनी केलीय.
अपक्षांमध्ये जे निवडून येणार आहेत, त्यांच्याशी संपर्क केला जातोय. बच्चू कडू यांना माहित आहे की, ते जरी अपक्ष असले तरी त्यांनी प्रत्येक वेळी कोणाला तरी पाठिंबा दिला आहे. अपक्षांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, आम्ही सुद्धा काही अपक्षांच्या संपर्कात आहोत असं देखील शिरसाट यावेळी म्हणाले आहेत.