Sanjay Shirsat : वज्रमुठ सभेत अजित पवार फक्त शरीराने, त्यांच्या मनात काय ते 2-3 दिवसांत कळेल
Sanjay Shirsat say where Ajit Pawar is mentally will be known in 2-3 days : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे अजित पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मात्र, या चर्चांना थांबत नाहीत. दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अजित पवारांविषयी मोठं विधान केलं. अजित पवारांचे मन कुठे आहे हे येणाऱ्या 2-3 दिवसांत कळेल, असं शिरसाट यांनी सांगितलं. त्यामुळं अजित पवार BJP सोबत जाणार का? या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं.
मागील काही दिवसापांसून अजित पवार यांच्याच नावाची चर्चा आहे. अजित पवार नॉट रिचेबल असतांना ते भाजपसोबत जाणार का? आणि मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चांना उत आला होता. या चर्चेनंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तरी अजूनही चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत. आता संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवार मनापासून कुठे आहेत, हे येणाऱ्या 2-3 दिवसात कळेल. पहिले चुकलेले पाऊल पुन्हा चुकू नये, यासाठी अजित पवार हे एक एक पाऊल सांभाळून टाकत आहेत. त्यामुळं काही दिवस प्रतिक्षा करावी लागले. अजित पवार लवकरच निर्णय घेतील. घाई करून नका, असा दावा शिरसाट यांनी केला.
पुण्यात ताकद काँग्रेसची की, राष्ट्रवादीची?; NCP च्या शहराध्यक्षांनी हिशोबच सांगितला!
संजय शिरसाट यांनी अजित पवार भाजपसोबत गेल्यास शिवसेना भाजपसोबत राहणार नाही, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा शिरसाट यांनी नवा दावा केला आहे. शिरसाट म्हणाले की, आज सगळ्यात जास्त त्रास अजित पवारांना होत असेल. सभेत त्यांची खुर्ची ठेवायची की नाही, याबाबत कालपर्यंत संभ्रम होता. याबाबत कमिटी स्थापन केलेली होती. त्यातही अजित पवारांना घेण्यात आलं नव्हतं. अजित पवार वज्रमुठ सभेला गेले तर ते मनापासून त्या सभेत नसरणार आहेत. शरीराने राहिले तर राहतील. वज्रमुठ सभेत त्यांना काडीचाही रस नाही. अजित पवार हे सगळे विषय हसून खेळून टोलवत आहेत. याचाच अर्थ त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. ते निर्णय शंभर टक्के घेतील. अजित पवार मनापासून कुठे आहेत, हे 2-3 दिवसांत कळेल.
वज्रमूठ सभेवरून शिरसाट यांनी मविआसह उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, याआधी सुध्दा त्या मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहेत. त्या सभांशी आजच्या वज्रमुठ सभेची तुलना करता येणार नाही. तर फक्त तीन पक्ष एकत्र येऊन गर्दी करत आहे आणि आम्ही एकत्र आहोत, हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. सभेमुळे जनमाणसात बदल होतोय, हे समजणं चुकीचं आहे. त्यामुळं या सभेकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, असा टोला लगावला.