पुण्यात ताकद काँग्रेसची की, राष्ट्रवादीची?; NCP च्या शहराध्यक्षांनी हिशोबच सांगितला!

  • Written By: Published:
पुण्यात ताकद काँग्रेसची की, राष्ट्रवादीची?; NCP च्या शहराध्यक्षांनी हिशोबच सांगितला!

विष्णू सानप

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून पोट निवडणुकीची तयारी केली जात आहे. एवढेच काय तर, दिग्गज नेत्यांकडून दावे-प्रतिदावेदेखील करण्यात येत आहेत.

Shinde VS Thackery : ‘वज्रमूठ’ सभेपुर्वी शिवसेनेचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ‘या’ खासदाराचे निकटवर्तीय शिवसेनेत

दरम्यान, पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. आज घडीला पुण्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी असून काँग्रेसने ही जागा मोठ्या मनाने आम्हाला द्यावी, असं विधान राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ‘लेट्सअप मराठी’शी बोलताना केलं आहे.

Aapla Dwakahana : आजपासून राज्यात ‘आपला दवाखाना’सुरू, योजना नेमकी काय आहे?

जगताप म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला पराभूत करणे ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढली आहे. मात्र, ज्या ठिकाणी काँग्रेसचा सातत्याने पराभव होतोय किंवा राष्ट्रवादीचा पराभव होतोय त्या ठिकाणी आम्ही जागांची अदलाबदल केलेली आहे. आम्ही हिंगोलीमध्ये तर राष्ट्रवादीने जिंकलेली जागा स्वर्गीय राजीव सातव यांच्यासाठी सोडली होती. आता काँग्रेसने व मित्रपक्षांनी आपले सर्व्हे करावे आणि राष्ट्रवादीची ताकद जर पुण्यात त्यांच्यापेक्षा जास्त असेल तर, पुण्याची जागा ही राष्ट्रवादीला मोठ्या मनाने सोडावी, असे जगताप म्हणाले.

BrijBhushan Sharan Singh ; ‘पंतप्रधानांनी सांगितले तर मी तात्काळ राजीनामा देईन’

पुण्यात तुलनात्मक जास्त ताकद राष्ट्रवादीची की काँग्रेसची?

जगताप पुढे म्हणाले की, 2007 ते 2017 पर्यंत पुणे महानगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 42 जागा तर, काँग्रेसच्या नऊ जागा निवडून आल्या. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला आहे. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसचा एकही आला नाही. याचा अर्थ आमची ताकद फार मोठी आणि काँग्रेसची कमी असा होत नाही. मात्र, आमची ताकद ही कागदावर आणि रस्त्यावर खूप मोठी आहे. हे पुणेकरांना आणि माध्यमांना माहित आहे, असे सांगत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीचा एक प्रकारे हिशोबच मांडला आहे.

अजित पवार विद्यार्थी झाले; बाकावर बसले अन् गणिताचा सरावही केला

दरम्यान, पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनानेदेखील निवडणूक तयारीचे निर्देश दिले आहेत. यामुळे पोटनिवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दावे करायला सुरुवात केली आहे. भाजपकडून काही नावे चर्चेत असून महाविकास आघाडीमध्ये मात्र, ही जागा काँग्रेस की राष्ट्रवादी लढवणार यावर मात्र अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकमत होऊन राष्ट्रवादीला ही जागा सोडली जाणार का? की, काँग्रेसच आपल्या जागेवर अडून बसणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube