अजित पवार विद्यार्थी झाले; बाकावर बसले अन् गणिताचा सरावही केला

Untitled Design   2023 05 01T104345.436

Ajit Pawar became a student of Zilla Parishad School : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, काल एका शाळेच्या कार्यक्रमात अजित पवार हे चक्क विद्यार्थी झाल्याचं पाहायला मिळालं. काल पुण्याच्या मावळमध्ये अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या फ्युचरिस्टिक क्लासरूमचे उद्घाटन झाले. यावेळी अजित पवार यांनी या क्लासरुमची पाहणी केली. विद्यार्थ्यांथी बसतात त्या डेस्कवरू बसून क्लासरुम विषयी त्यांनी शिक्षकांना प्रश्न केले. जणू अजित पवार हे विद्यार्थीच झाले होते. एवढचं काय तर त्यांनी डिजिटल डेस्कटॉपवर (Digital Desktop) गणिताचा सराव देखील केली.

यावेळी पुणे जिल्हा परिषेदेचे सीईओ आयुष्य प्रसाद, आमदार सुनील शेळके, कान्हे फाटा येथील जिल्हा परिषदे शाळेतील शिक्षण आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अजित पवार हे काल पुण्यातील मावळ दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेत फ्युचरिस्टिक क्लासरुम सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन झाल्यावर त्यांनी क्लासरुम विषयी त्यांनी शिक्षकांना प्रश्न केले. जणू अजित पवार हे विद्यार्थीच झाले होते. एवढचं काय तर त्यांनी डिजिटल डेस्कटॉपवर गणिताचा सराव देखील केली. क्लासरुममध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहून, हा कार्यक्रम मुलांसाठी, की तुमच्यासाठी तुम्ही बाहेर जाता की, मी बाहेर जाऊ? असा सज्जड दम त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

तब्बल 45 तासांनंतर भिवंडीतील बचावकार्य थांबले; दुर्घटनेत एकुण 8 जणांचा मृत्यू

अजित पवारांनी दम दिल्यावर गर्दी बरीच कमी झाली होती. ही गर्दी कमी झाल्यानंतर अजित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या डेस्कवर बसून डिजिटल क्लासरुमची माहिती घेतली. डिजिटल डेस्कटॉपवर अत्याधुनिक पेनाच्या साहाय्याने गणिताचा सराव देखील त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. फ्युचरिस्टिक क्लासरुमसारखे डिजिटल क्लासरुमची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us