तब्बल 45 तासांनंतर भिवंडीतील बचावकार्य थांबले; दुर्घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू

तब्बल 45 तासांनंतर भिवंडीतील बचावकार्य थांबले; दुर्घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू

Building collapse site in Bhiwandi :  मुंबईच्या भिवंडीतील वलपाडा परिसरात 29 तारखेला  दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती होती.यानंतर अनेकांना  ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या 45 तासांनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आल्याचे एनडीआरएफने सांगितले आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली होती.

या दुर्घटनेमध्ये एकुण आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या 45 तासांनंतर येथील बचावकार्य थांबवण्यात आले आहे. एनडीआरएफने याची माहिती दिली आहे. वलपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वर्धमान नावाची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीच्या तळ मजल्यावर एक गोडाऊन होते. त्या गोदामात 30 हून अधिक लोक काम करत होते. तर वरील सर्व मजल्यावर सर्व कुटुंब राहत होती. ही इमारत कोसळ्याने यात 50 ते 60 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती होती.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनास्थळाला भेट दिली होती. याठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून केली जाणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्री शिंदेंचे अभिवादन

तसेच या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेतले आहे. या इमारतीचे बांधकाम ठेकदार कोण होते? याचाही शोध सुरु आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे.

LPG Price : आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube