महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्री शिंदेंचे अभिवादन
Chief Minister Shinde greets the martyrs on the occasion of Maharashtra Day : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला (Martyrs Memorial) पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी मराठी लोकांनी लढा उभारला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष झाला होता. स्वतंत्र महाराष्ट्र व्हावं, या आदोलकांच्या मागणीला अखेर यश मिळालं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे. तो मोठ्या प्रमाणात राज्यभर साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या रोजी केले जाते.
दरम्यान, आज संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनता सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शहीद वीरांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
आरबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 291 रिक्त जागांसाठी भरती, पगार 55, 2000 रुपये महिना
महाराष्ट्राला सहसासहजी काही मिळालेलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी महाराष्ट्राने संघर्ष केला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही संघर्षातून, शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानाच्या त्यागातून झाली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, निपाणी हे जिल्हेदेखील महाराष्ट्रात यावे, ही मागणी होताी. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे. आजही सीमावासियांना आणि सीमाभागातील खेड्यांना महाराष्ट्रात सहभागी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा संघर्ष आजही सुरु आहे. असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मुख्य सचिव, राज्याते महिला व बालकल्याण मंत्री मगलप्रभात लोढा तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.