आरबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 291 रिक्त जागांसाठी भरती, पगार 55, 2000 रुपये महिना

आरबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 291 रिक्त जागांसाठी भरती, पगार 55, 2000 रुपये महिना

Mega recruitment for 291 seats in Reserve Bank of India : मागील गेल्या काही दिवसांपासून सरकारी विभागासह खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जात आहे. त्यामुळं बेरोजगार असलेल्या तरुण-तरुणांना नोकरी मिळण्यासाठी अनेक मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. अगदी बॅंकींग क्षेत्रातही नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही देखील बॅंकींग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आरबीआयद्वारे (RBI) लवकरच 291 जागांसाठी नव्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. रिक्त जागांसाठी इच्छुक उमदेवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या rbi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भरतीसंबंधी माहिती उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांमध्ये भरतीसाठी अॅप्लीकेशन लिंक अॅक्टीव्ह होणार असल्यची माहिती समोर आली आहे.

आरबीआयच्या भरतीमध्ये ग्रेड बी ऑफीसर पदाच्या एकूण 291 रिक्त जागा आहेत.

रिक्त पदांचा तपशील
अधिकारी ग्रेड बी जनरल -238
अधिकारी ग्रेड बी DEPR – 38
अधिकारी ग्रेड बी DSIM – 31

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 9 मे 2023 रोजी सुरूवात होणार आहे. तर 9 जून 2023 हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. या एका महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना अरज भरुण दाखल करावा लागणार आहे.

अधिकारी ग्रेड बी जनरल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून 60 टक्के मार्कांसह कोणत्याही शाखेत पदवीधर असणं आवश्यक आहे.

अधिकारी ग्रेड बी DEPR या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा अर्थशास्त्र किंवा अर्थमिती किंवा परिमाणात्मक अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र विषयात पीजी असणं असणे आवश्यक आहे.

अधिकारी ग्रेड बी DSIM या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा आयआयटी खरगपूरमधून सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/गणितीय अर्थशास्त्र/अर्थमिति/सांख्यिकी आणि माहिती शास्त्रात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

Amol Kolhe Injured: ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना दुखापत

अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा द्यावी लागणार आहे. त्या परिक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल. आणि सर्वात शेवटी मुलाखतीनंतर योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. जून महिन्यामध्ये ऑनलाईन परीक्षा, जुलैमध्ये दुसऱ्या स्तरावरील परीक्षा आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मुलाखत होईल असा या भरती परीक्षेचा क्रम असू शकतो.

भरतीसाठी सहभागा होणाऱ्या उमेदवारांना ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागणार आह.

ओपना आणि ओबीसी या गटामध्ये असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करतांना 850 रुपये घेतले जातील. तर एससी, एसटी, आणि पीडब्ल्यूडी या गटातील उमेदवारांना 100 रुपये प्रवेश शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.

पगार –
अधिकारी ग्रेड बी – 552000 रुपये महिना
अधिकारी ग्रेड बी DEPR – 445000 रुपये महिना

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube