Amol Kolhe Injured: ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना दुखापत
Amol Kolhe Injured: ‘शिवपुत्र संभाजी’ (Shivputra Sambhaji) या महानाट्याचे शेवटचे दोन प्रयोग छत्रपती कराडमध्ये पार पडत आहेत. यावेळी नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांच्या पाठीला दुखापत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
तरीही जिद्दीने प्रयोग पूर्ण केला. परंतु उद्या कराड मधील शेवटचा प्रयोग करून उपचार घेणार आहे, जेणेकरून ११ मे पासून पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या प्रयोगात काहीही बदल होणार नाही.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये कसे येतात. त्यांचा मेकअप, पोशाख कसा कोला जातो. या नाटकाच्या पडद्यामागे नेमकं काय घडतं? या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहे.
राम शिंदे- रोहित पवार यांना कर्जत आणि जामखेड बाजार समित्यांत समसमान जागा, कोणाचा होणार सभापती?
या व्हिडीओमध्ये अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की, ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य संपताना अवघ्या काही वेळात भरजरी पेहरावातील छत्रपती संभाजी महाराज पुन्हा प्रेक्षकांसमोर येतात. कारण पालक तेथे आपल्या मुलांना घेऊन आलेले असतात. त्या पुढील पीढीसमोर तेच राजबिंडे छत्रपती संभाजी महाराजच आले पाहिजे अशी प्रतिक्रिया अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.