LPG Price : आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात

LPG Price : आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात

Commercial LPG Gas Price : गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांची आणि व्यावसायिकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र आता यामध्ये काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात केली आहे. ही कपात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरसाठी ही कपात लागू करण्यात येणार आहे.

आसाम सरकार 300 मद्यधुंद पोलिसांना VRS देणार, सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

ही जाहीर करण्यात आलेली एलपीजी सिलिंडरच्या किमतील घट आज 1 मे पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्लीत आता एलपीजी सिलिंडर 1856.50 रूपायांना मिळेल तर मुंबईत एलपीजी सिलिंडरचे दर हे 1808.50 रूपये इतके असणार आहेत.

दरकपातीआधी या शहरांमध्ये सिलिंडर्सच्या किमती अनुक्रमे 2028 रुपये आणि 1980 रुपये रुपये इतक्या होत्या. मात्र दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube