BrijBhushan Sharan Singh ; ‘पंतप्रधानांनी सांगितले तर मी तात्काळ राजीनामा देईन’

BrijBhushan Sharan Singh ; ‘पंतप्रधानांनी सांगितले तर मी तात्काळ राजीनामा देईन’

BrijBhushan Sharan Singh On Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (BrijBhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आठवडाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटू धरणे धरत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलक कुस्तीगीरांची (wrestler) मागणी आहे. या सर्व मुद्द्यावर भाजप खासदाराने एबीपी न्यूजशी खास बातचीत करत आपली बाजू मांडली.

राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले की, “मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. मी निर्दोष आहे हे मला माहिती आहे आणि कोणत्याही तपासाला सहकार्य करू.”

ते पुढं म्हणाले की, “मी राजीनामा देत नाही कारण या लोकांनी माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत आणि मी गुन्हेगार म्हणून कसे जगू शकेन.” यासोबतच या लोकांनी कधीही राजीनामा मागितला नाही. त्यांची विधाने सतत बदलत राहिली, असेही ते म्हणाले.

MI vs RR :राजस्थानचे मुबईसमोर 213 धावांचे मोठे लक्ष्य, मुंबईच्या डावाची सुरुवात

षडयंत्र असल्याचा आरोप करताना ते म्हणाले, “यामागे शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले असून दीपेंद्र हुड्डासोबत एक मोठा उद्योगपतीही यात सामील आहे. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर दाखवा, मी राजीनामा देईन, असे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तर तुम्ही राजीनामा द्याल का? प्रत्युत्तरात ते म्हणतात, “मी लगेच राजीनामा देईन. केवळ पंतप्रधानच नाही, अमित शहा, जेपी नड्डा यांच्यापासून कोणीही पक्षात म्हटले तरी मी राजीनामा देईन.

ते म्हणाले की, “जोपर्यंत न्यायालय मला दोषी ठरवत नाही तोपर्यंत मी दोषी नाही. कायद्याचा निर्णय मान्य केला जाईल. मी कधीच काही चूक केली नाही आणि करणारही नाही. माझे यश संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते पुढं म्हणाले, “उत्तर प्रदेशातील कोणत्याही पक्षाने माझ्याविरोधात वक्तव्य केलेले नाही. काँग्रेसच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube