Aapla Dwakahana : आजपासून राज्यात ‘आपला दवाखाना’सुरू, योजना नेमकी काय आहे?

Aapla Dwakahana : आजपासून राज्यात ‘आपला दवाखाना’सुरू, योजना नेमकी काय आहे?

Balasaheb Thackeray Aapla Dwakahana Scheme start : राज्यामध्ये आजपासून ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray) ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची योजना सुरू होणार आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ही योजना सुरू होणार आहे. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.

आपण आपल्या बजेटमध्ये घोषित केलं होत की, महाराष्ट्रमध्ये 500 आपला दवाखाना ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आम्ही सुरू करू. आज त्यातील 300 पेक्षा जास्त दवाखाने सुरू होणार आहेत. या दवाखान्यांमध्ये 30 प्रकारच्या टेस्ट मोफत करण्यात येणार आहेत. औषधही मोफत दिले जाणार आहेत. तसेच वेगवेगळेया प्रकारची कन्संल्टन्सी मोफत दिले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी जनतेला अनोखं गिफ्ट

त्यामुळे राज्यातील सामान्या माणसाला त्याचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेच्या उद्धाटन मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. मी देखील नागपूरमधून त्या उद्धाटनासाठी उपस्थित राहणार आहे.

या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या वाढदिवशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)आपला दवाखाना या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली होती. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आज येथे सांगितलं होतं.

‘आपला दवाखाना’ योजना नेमकी काय आहे?

-‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची योजना
-राज्यभरात 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत पैकी 300 दवाखाने आज सुरू होत आहेत
– 25 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखाना सुरू करण्याचं नियोजन
– ग्रामीण भागात एसटी स्थानकाजवळ ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचं नियोजन
– 30 टेस्ट, वैद्यकीय सल्ल्यासह औषधे मोफत दिली जाणार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube