पुणे हादरले; थट्टामस्करीच्या कारणातून मित्राने मित्राला संपविले !

pune : तरुणाच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजच्या सह्याने पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  • Written By: Published:
Pune Crime

पुणे: थट्टामस्करीच्या कारणातून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना पुणे शहरातील (Pune) कॅम्प परिसरात घडलीय. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फैसल फारूख खान असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजच्या सह्याने पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. त्यातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फैसल फारुख खान याने आरोपी शाहबाज शेख याची थट्टामस्करी केली. त्याचा राग शाहबाज शेख याला आला. त्यातून मृत फैसल खान याने शाहबाज चांद शेख याच्या कानाखाली मारली. त्यातून वाद वाढला. त्यानंतर शाहबाज शेख आणि त्याच्या बाकीच्या साथीदारांनी धारधार चाकुने फैसल खान याच्या छातीत, हातावर आणि डोक्यावर वार करत जखमी केले.

चार ते पाच जणांनी फैसल खानवर हल्ला केला. त्यावेळी मित्रांची भांडणे सोडण्यासाठी काही जण पुढे आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. फैसल खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर कॅम्प पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यातील मुख्य आरोपी शाहबाज शेखसह चार जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

follow us