Ajit Pawar Passes Away : दादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार; मोदी-शाह उपस्थित राहणार
Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
PM Modi & Amit Shah Will Present For Ajit Pawar Last Funeral : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीला जाताना दादांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनचा अपघात झाला यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या पार्थिवावर उद्या (दि.29) रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Ajit Pawar Death : घड्याळापासून सुरू झालेला प्रवास घड्याळावरच थांबला!
उद्या सकाळी 11 वाजता होणार अंत्यसंस्कार
दादांचे पार्थिव आज दुपारी 4 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (दि. 29) सकाळी 9 वाजता गदीमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरूवात होणार असून, गदिमा सभागृह, विद्या प्रतिष्ठान चौक, भिगवण रोड सेवा रस्ता मराठी शाळेच्या गेटने विद्या प्रतिष्ठानच्या गेटवर जाईल. त्यानंतर 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
उद्या होणार अजितदादांवर अंत्यसंस्कार
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्याआधी अंतिम दर्शनासाठी पार्थिव शारदा प्रांगण येथे ठेवले जाणार आहे. अपघाताची बातमी समजताच शरद पवार मुंबईहून तर, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे दादांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांची रूग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.
अजितदादा : मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा असलेले तडफदार नेते; वाचा एक खास लेख
अजित पवार हे जनतेचे नेते होते
अजितदादांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी एक्कसवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले की, अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.”
Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and… pic.twitter.com/mdgwwGzw4R
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2026
माझा दमदार अन् दिलदार मित्र मी गमावला – फडणवीस
महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते. मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पार्थ पवारसोबत माझे बोलणं झाले अशा गोष्टीवर मन विश्वासच ठेवत नाही. हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.
अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू
बारामती येथे झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विनित जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट होते. या सर्वांचा यात मृत्यू झाला आहे. मुंबईतून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते. तर, बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला अन् आतील प्रवाशांचा मृत्यू झाला.
