Bankipur by Election: जेन-झीचा पहिला झटका भाजप ‘बॉस’च्या बालेकिल्ल्याला ? पीकेने घाम फोडला…

Bankipur by Election-बांकीपूरसाठी पोटनिवडणूक लागली आहे. 30 जुलैला मतदान होणार असून, 3 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

  • Written By: Published:
Bankipur By Election

Bankipur by Election : दिल्लीतील ‘जेन झी’ (Gen Z ) आंदोलनापुढे मोदी सरकारला झुकावे लागले. या आंदोलनानंतर एक पोटनिवडणूक होतेय. ही पोटनिवडणूक आहे बिहारमधील बांकीपूर विधानसभेची (Bankipur By Election). हा मतदारसंघ 25 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात भाजपचे बॉस नितीन नबीन (Nitin Navin) यांचा मतदारसंघ. नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि ते राज्यसभेवर गेले. त्यामुळे बांकीपूरसाठी पोटनिवडणूक लागली आहे. 30 जुलैला मतदान होणार असून, 3 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात भाजप (BJP) आरजेडी (RJD) जनसुराज अशी तिरंगी लढत होत आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला तरी या निवडणुकीत मात्र भाजपला घाम फुटल्याचे राजकीय विश्लेषण आहे.


बांकीपूर विधानसभा मतदारसंघावर नबीन यांचा बालेकिल्ला

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा राजधानी पटनामधील मतदारसंघ आहे. मतदारसंघ रचनेपूर्वी हा मतदारसंघ पटणा पश्चिम म्हणून ओळखला जात होता. 2006 ला नितीन नबीन पहिल्यांदा येथून निवडून आले. मतदारसंघ फेररचनेनंतर 2010 ते 2025 असे सलग चारवेळा येथून निवडून आलेत. गेल्या वर्षी ते तब्बल 52 हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या उमेदवार रेखाकुमारी गुप्ता यांचा पराभव केला होता.


बांकीपूरच्या उमेदवार भाजपने अचानक बदलला फटका बसणार ?

बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने पहिल्यांदा अभिषेक कुमार उर्फ बंटी यांना उमेदवीर जाहीर केली होती. पण अवघ्या 24 तासांत अभिषेक यांनी ‘कौटुंबिक कारणांमुळे’ उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. परंतु अभिषेक कुमार यांची आई वडिल चारा घोटाळ्यात दोषी आढळलेले आहेत. त्यामुळे भाजपवर टीका होऊ शकते म्हणून त्यांना उमेदवारी माघार घेण्यास सांगितले. तसेच अभिषेक कुमार यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानकि नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर भाजपने 32 वर्षीय नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवार घोषित केली.


सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा! प्रेक्षकांची उत्सकता वाढली


प्रशांत किशोर रिंगणात, तिरंगी लढतीत कोण धुरंधर ?

या जागेवर तिरंगी लढत होतेय. भाजपकडून नीरजकुमार सिन्हा. जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर आणि आरजेडीच्या रेखाकुमारी गुप्ता अशी तिरंगी लढत होत आहे. गेल्या वर्षी बिहारच्या सर्व विधानसभा मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी उमेदवार दिले होते. परंतु प्रशांत किशोर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. आता ते स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे येथे चुरशीची निवडणूक झाली आहे. भाजपच्या उमेदवारासाठी थेट राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे प्रचारात उतरले होते. तर आरजेडीचे प्रमुख तेजस्वी यादव यांनीही आपल्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत भाजपला घेरले आहे. तर प्रशांत किशोर यांनी थेट दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन, बिहारमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत भाजपला घेरले आहे. मतदानाला जाताना विद्यार्थ्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा, असे आवाहन प्रशांत किशोर यांनी मतदारांना केले आहे. शिक्षणाचा हक्क, बिहारी मुलांना बिहारमध्येच रोजगार मिळावा, हा मुद्दा प्रचारात आणला आहे.


‘भाजपचा भावी नेता’…मंत्री गिरीश महाजनांची आमदार मंगेश चव्हाणांवर कौतुकाची थाप


बांकीपूर शहरी मतदार आणि जातीय राजकारण

बांकीपूर हा शहरी मतदार आहे. येथे भाजपला मानणारा मतदार आहे. बांकीपूरमध्ये महाआघाडी म्हणजे आरजेडी-काँग्रेसची ताकद एकदम कमी आहे. गेल्या निवडणुकीत ते दिसून आले आहे. त्यात प्रशांत किशोर यांना स्थानिक मुद्द्यांवर मतदारांनी साथ दिल्यास ते मतदारसंघात करिश्मा करू शकतात. या मतदारसंघ अल्पसंख्याक, यादव मतदार आहेत. परंतु ग्रामीण भागासारखे प्राबल्य नाहीत.


आंदोलनानंतर भाजपसाठी लिटमस टेस्ट

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे लोण सर्वाधिक बिहारमध्ये दिसून आले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. गोळ्या झाडल्या. त्याचा रोषही तरुणांवर आहे. त्यामुळे याचा परिणाम येथे होऊ शकतो. झेन झीच्या आंदोलनानंतर भाजपसाठी ही लिटमस टेस्ट असून, तेही राष्ट्रीय अध्यक्षांचा बालेकिल्ल्यात. त्यामुळे भाजप पुन्हा हा मतदारसंघ राखून झेन-जी आपल्यावर नाराज नसल्याचे दाखवून देऊ शकतात.

follow us