सरकारविरोधात कोणीही लढणार नाही, शरद पवार हे BJP चे हस्तक; आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar On Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप केलेत. त्यांनी शरद पवार हे पूर्णपणे भाजपचे (BJP) हस्तक असल्याचा दावा केला आहे.
ईडीने 23000 कोटींचा काळापैसा पीडितांना वाटला; सॉलिसिटर जनरल मेहतांची कोर्टात माहिती
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) August 7, 2025
प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताा त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमध्ये एकही देश आपल्या बाजूनं नव्हता. यात रशियासारखा मित्र आपण गमावला आहे. भाजप आणि मोदींची भाषा ही रशियावर उपकार करतोय अशी आहे. म्हणूनच ऑपरेशन सिंदूरनंतर रशियाने पाकिस्तानला मदत करू, अशी भूमिका घेतली. संपूर्ण जग भारताला घेरण्याच्या भूमिकेत आहे. यामुळं व्यक्ती की देश हा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व केवळ एकट्या नरेंद्र मोदींमुळे झालेय. देशाला या स्थितीतून बाहेर काढायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला सत्तेत येऊ देता कामा नये. मतदार त्यांना बळी पडले, तर देशाचा बळी जाईल. त्यामुळे मतदार शहाणपणाने वागणार की नाही हे त्यांनाच ठरवायचे आहे.
ब्रेकिंग : कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार; पुढचं टार्गेट मुंबई; बिश्नोई गँगची धमकी
देशाचं नेतृत्व करण्यासाठी पर्याय कोण ? यावर विचार करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षापासून भारताला वाचवायचं आहे. १४० कोटी लोकांपैकी कोणीही पुढे येऊन देश चालवू शकतो. ही ताकद आणि हिंमत आपल्यात आहेत, असंही आंबेडकर म्हणाले.
शरद पवार भाजपचे हस्त
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर भाजपचे हस्तक असल्याचाही गंभीर आरोप केला. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत असली तरी शरद पवार भाजपचे हे हस्तक आहेत. ते यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. राष्ट्रीय पातळीवर घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत. तुमच्यापुढं असणारे लोक वेगळे आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का? या विरोधकांना लकवा मारल्यामुळं ते मोदींना विरोध करू शकत नाही, आमच्याशिवाय या सरकारविरोधात कुणीही लढणार नाही, असंआबंडेकर म्हणाले.
आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार सेल तर वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. व्हीव्हीपॅट नसेल तर आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही. व्हीव्हीपॅट असेल तरच निवडणुकीत सहभागी झालं पाहिजे, पण विरोधक या घडामोडीत कुठंच दिसत नाहीत, त्यांना कुणी विचारतही नाही, असं आंबेडकर म्हणाले.