आमदारकीची टर्म संपत आल्याने अजितदादांविषयी तडफड; हाकेंची मिटकरींवर टीका

अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केले होते. त्याचे कर्तुत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणे एवढेच होते.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 08T192448.538

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Baramati) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रोज शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर आता लक्ष्मण हाके यांनी एकप्रकारे टीका केली आहे. अजित दादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोण विमानात बॉम्ब ठेवला म्हणतो, कोण आत्मघातकी हल्ला म्हणतो, हा सर्व प्रकार अजित दादांच्या मृत्यूचं भांडवल करून स्वतःचे अस्तित्व ठेवण्याची तडफड असल्याची टीका त्यांनी केली आहे.

अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केले होते. त्याचे कर्तुत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणे एवढेच होते. आता अजितदादाही राहिले नाहीत आणि त्याचे आमदारकी ही संपत आलेली असताना अस्तित्व टिकवण्यासाठी ही केविलवाणी धडपड केली जात असल्याचा टोलाही हाके यांनी लगावला. जर यांच्याकडे कुठली पुरावे असतील तर त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा तपास यंत्रणा यांच्याकडे देणे गरजेचे आहे. नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कोणावर विश्वास नसेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. त्यांच्याकडे पुरावे द्यावेत. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी केविलवाणी धडपड करू नये, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली पवार कुटुंबाची भेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर केलं थेट भाष्य

अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या VSR कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच नादुरुस्त होती, वर्षभरापासून कंपनीवर बंदी होती. आणि तेच विमान अजितदादांसाठी 28 तारखेला देण्यात आले. दुसरीकडे डिसेंबर 2025 च्या महिन्यात VSR कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवला होता. जर 50 कोटींचा विमा उतरवला गेला असेल, आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला असेल अन त्याला हिप्नोटाईज केले होते का?, त्याला आमिष दाखवलं होत का? अनेक ठिकाणी हिप्नोटाइज करून सुसाईड बॉमरचा वापर केला जातो.

दरम्यान, अजमल कसाब याला दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवले होते. दुसरीकडे राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती, त्यावेळी देखील असा प्रयत्न केला गेला होता. पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां? हा मोठा प्रश्न आहे. कारण, पायलेटने MAYDAY कॉल दिला नाहीये. टेक ऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं, मात्र, पायलटने ते केलं नाही. त्यामुळे आम्हाला मोठी शंका VSR कंपनीवर आहे. 50 कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करा लावलं कां? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले.

Tags

follow us