सावरकरांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळणार?, सरसंघचालक मोनह भागवत काय म्हणाले?
दरम्यान भाजपची सत्ता आल्याने संघाला चांगले दिवस आलेत का? असा प्रश्नही यावेळी मोहन भागवत यांना विचारण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का अद्याप का मिळाला नाही? या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. मोहन भागवत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी त्या समितीत नाही त्यामुळे मला माहिती नाही परंतु जर तो सन्मान त्यांना मिळाला तर त्या पुरस्काराचं महत्व वाढेल. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे.
जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत राज्यघटनेने दिलेले आरक्षण सुरू राहिलं पाहिजं. जातीवाद हा मुळासकट उखडला पाहिजे जे शतकानुशतके विषमतेचा बळी ठरले आहेत, त्यांना वर आणण्यासाठी वरच्या स्तरावरील लोकांनी थोडे झुकले पाहिजे आणि त्यांना हात दिला पाहिजे. भारत विरोधी शक्ती कितीही स्वप्ने पाहत असल्या तरी आता भारत तोडणारे स्वतःच तुटून जातील आणि भारत जोडला जाईल. आपण मनात ‘अखंड भारताचा’ संकल्प मजबूत केला पाहिजे, असंही भागवत म्हणाले.
निवड जात पाहून नाही
एससी/एसटी असणे हे ‘डिस्कॉलिफिकेशन’ नाही किंवा ब्राह्मण असणे हे ‘क्वालिफिकेशन’ नाही. जो उपलब्ध आहे आणि सर्वोत्तम आहे, त्याला जबाबदारी दिली जाते. शहरांमध्ये वस्त्यांच्या आधारावर आणि ग्रामीण भागात गावांच्या गटांच्या (मंडळ) आधारावर काम चालते, ज्यामुळे सर्व जातींचे लोक संपर्कात येतात. ते म्हणाले की, विरोध करणाऱ्यांच्या मनात जेव्हा हे येते की आम्ही इतका विरोध केला तरी त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा ते आमचे ऐकायला लागतात.
भाजपमुळे आमचे नाही आमच्यामुळे भाजपचे चांगेल दिवस
दरम्यान भाजपची सत्ता आल्याने संघाला चांगले दिवस आलेत का? असा प्रश्नही यावेळी मोहन भागवत यांना विचारण्यात आला. भाजप सत्तेत आल्यामुळे आमचे चांगले दिवस आले असं नाही याच्या उलट आहे. आमची शक्ती आहे लोक आमचं ऐकतात, त्याचा फायदा त्यांना होतो, तसेच आमचं काम वाढलं आहे, त्यांनी आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. आम्ही भाजपवर कोणताही दबाव टाकला नाही, आमच्या संघाच्या शाखेत कोणतेही राजकारण होत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
