संगमनेरला विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे शिस्तबद्ध पथसंचलन ; आमदार खताळांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग

Rashtriya Swayamsevak Sangh : विजयादशमी निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Rashtriya Swayamsevak Sangh

Rashtriya Swayamsevak Sangh : विजयादशमी निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. या पथ संचलनामध्ये संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी स्वतः स्वयंसेवक म्हणून सहभागी होत संघाच्या कार्यकर्त्यांसोबत संपूर्ण शहरातून पायी चालत पथसंंचालन केले. पारंपरिक गणवेशातील स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन, एकसमान पावले आणि संघभावनेचे दर्शन यामुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. विविध भागांत नागरिकांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले.

संगमनेर शहरातील अकोले नाका शारदा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एकत्र जमले. यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलनाला सुरुवात झाली. या पथसंचलनामध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक सुभाष कोथिंबीर, सोपानराव देशमुख आणि संघाचे अनेक पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले होते. अकोले नाका येथून सुरू झालेले हे पथसंचलन नगरपालिका परिसर, लालबहादूर शास्त्री चौक, रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, देवी गल्ली, मेन रोड, माळीवाडा, नेहरू गार्डन, बी.एड. कॉलेज आणि अकोले बायपास रोड या मार्गाने पुढे गेले. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना स्वयंसेवकांचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. नागरिकांनी या पथसंचलनाला प्रतिसाद दिला.

एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिले का? मनोज जरांगेंचा मोठा सवाल

विजयादशमी सन हा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पथ संचलनालातून शिस्त, एकजूट,संघ भावना व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या पथसंचलनाची मातोश्री मंगल कार्यालय येथे सांगता झाली. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सहभागामुळे या पथसंचलनाला विशेष लक्ष वेधले गेले. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात पार पडलेल्या या संचलनातून स्वयंसेवकांचा उत्साह आणि संघभावना दिसून आली.

follow us