एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिले का? मनोज जरांगेंचा मोठा सवाल

Manoj Jarange On Eknath Shinde : मला 500 कोटी दिल्याची भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरु आहे. जरांगेंना 500 कोटी द्यायचे असं शिंदेंनी भाजपला

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Manoj Jarange On Eknath Shinde

Manoj Jarange On Eknath Shinde : मला 500 कोटी दिल्याची भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरु आहे. जरांगेंना 500 कोटी द्यायचे असं शिंदेंनी भाजपला सांगितलं का ? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील राजकारणात नवीन बॉम्ब टाकला.

नारायणगडावर (Narayangad) आयोजित दसरा मेळाव्यात (Dussehra Rally) बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, मी शेतकरी आणि मराठ्यांसाठी लढत आहे. माझ्या कानावर गेल्या तीन वर्षात काही गोष्टी आल्या आहेत. तुमच्या जवळच्या माझ्या जवळच्या काही लोक पैसे घेत आहेत. मला भेटण्यासाठी पैसे लागत नाही. त्यामुळे कुणालाही पैसे देऊ नका आणि दिले असेल तर माघारी घ्या असं मी म्हटलंय. अंतरवाली सराटीत आंदोलनाला बसल्यावर मला आठव्या की नवव्या दिवशी एक गोष्टी कळाली की, दोन अडीच वर्षांपूर्वी एक भयंकर षडयंत्र रचण्यात आलं होतं. मी कुणाची बदनामी करत नाही आणि कुणावर टीका देखील करत नाही मात्र उत्तर नाही दिले तर सोडणार नाही. मला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून उत्तर हवं आहे. शिंदे यांनी आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात उत्तर दिले पाहिजे. आज जमलं नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत उत्तर द्या.

दिल्लीतील भाजपचे (BJP) काही आणि राज्यातील भाजपचे काही नेते, शिंदेसाहेब तुम्ही भाजपच्या लोकांना असं सांगितलं का? माझ्याबद्दल की, जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्याचे आणि शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला तुम्ही दिले असं तुम्ही भाजपच्या नेत्यांना सांगितलं का? कारण अशी चर्चा सुरु आहे.

जरांगे पाटलांना श्रीकांत भैय्या शिंदे (Shrikant Shinde) यांच्या हातातून 500 कोटी रुपये पोहोचले. जरांगे पाटील थर्ड पर्सन आहे आपला असं तुम्ही भाजपला म्हणाले का? जर तुम्ही मला 500 कोटी रुपये दिले नसतील तर भाजप तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवतंय याचा छडा मी लावल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

किम जोंग उन यांच्या मृत्यूची अफवा, उत्तर कोरियाची सत्ता त्यांच्या बहिणीकडे; सत्य काय?

एकनाथ शिंदे तुम्ही मला श्रीकांत शिंदेंच्या हाती 500 कोटी दिले हे खरं आहे का? याबाबत उत्तर द्या. माझ्याकडे पुरावे देखील आहे. तुमच्यासमोर टाकणार आहे. याबाबत आज संध्याकाळी दसरा मेळाव्यात उत्तर द्या असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us